दक्षिण काश्मीरमधील अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा

0
काश्मीर :  दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा तालुक्यातील बागेंदर मोहल्ल्यात सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना आज सकाळी कंठस्नान घातलं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे. 

बागेंदर मोहल्लामध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना काही विश्वसनीय सूत्रांनी दिली होती. त्यानुसार बुधवारी रात्री या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले. दहशतवाद्यांना पहाटे सुरक्षा दलाने घेरले.

लगेच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर बेछूट गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केला. या परिसरात अजून दहशतवादी लपले आहेत का याचा शोध घेतला जातो आहे.

दरम्यान काश्मीरमध्ये शांततेच्या कारणांसाठी काही काळासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*