किशोरावस्थेतील मद्यसेवन करते मेंदू कमजोर

0
वॉशिंग्टन | वृत्तसंस्था : आजची चंगळवादी जीवनशैैली व काहीतरी वेगळेपणाचा अनुभव घेण्यासाठी अनेक मुले कमी वयातच मद्याची चव चाखतात. मात्र किशोरावस्थेत मद्यसेवन केल्याने मेंदूतील स्मृती जतन करणे व भाषा शिकण्याचे काम करणारा हिस्सा कमजोर करते. सोबतच जी मुले ङ्गक्त मजा व गंमत म्हणून मद्यसेवन करतात, भविष्यात ते त्याच्या आधीन जाऊ शकतात. अमेरिकेतील ओरिजॉन स्टेट युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका ताज्या अध्ययनातून हा इशारा देण्यात आला आहे.

या अध्ययनानुसार, जगातील अनेक देशांमध्ये किशोरवयीन मुलांचे मद्यसेवन सामाजिक सवय झाली आहे. ते ड्रिंकिंग गेम खेळतात. मद्यपानाचा आपला मेंदू व भावी जीवनावर काय प्रभाव पडू शकतो, याचा विचार न करता ते पेग घशात ढकलत असतात.

अमेरिकेत झालेल्या एका अहवालातून असे समोर आले आहे की, देशातील सुमारे २५ टक्के किशोरवयीन मुले दारू पितात. अर्थात ते दारूच्या आहारी नसतात. मात्र कधीकधी पितात. ओरिजॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या सहाय्यक प्राध्यापक अनिता सेसरवेंका यांनी सांगिते की, किशोरावस्थेत मेंदूत प्रक्रियेमध्ये असतो.

अशा परिस्थितीत मद्यपानाची सवय मेंदूच्या अनेक क्षमता कमी करते. शास्त्रज्ञांनी मद्यपानाच्या मेंदूवर होणार्‍या विविध प्रभावांची तपासणी केली. त्यात असे दिसून आले की, जी मुले मद्यसेवन करतात, त्यांची स्मरण व तर्कशक्ती कमजोर होत जातो. सोबतच त्यांची सचेत राहणे व भाषा शिकण्याची क्षमताही कमी होते.

LEAVE A REPLY

*