बॅलेट पेपर न पोहचल्याने बंदोबस्तावरील हजारो पोलीस कर्मचारी मतदानापासून वंचित

0
जळगाव । प्रतिनिधी :  शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी बॅलेट पेपर त्यांच्यापर्यंत पोहचविण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. परंतू जळगाव शहरातून इतर ठिकाणी बंदोबस्तावर गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे बॅलेट पेपर  मतदानाच्या दिवसापर्यंत न पोहचल्याने हजारो पोलीस कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूका शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात मतदान केंद्रांवर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बाहेरील जिल्ह्यातील पोलीस कुमक देखील मागविण्यात आली आहे. त्यानुसार पोलीस कर्मचार्‍यांना निवडणुकीसाठी नियुक्त्या देण्यात आल्या आहे. दुसर्‍या तालुक्यात डयुटीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचार्‍यांना निवडणुकीच्या दिवसापर्यंत बॅलेट पेपर उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.

दरम्यन प्रशासनाने पोलीस विभागाकडे पाठविले असल्याचे सांगितले. तर पोलीस प्रशासनाने बॅलेट मिळाले नसल्याचे सांगून टोलवाटोलवी केली. पोलीस कर्मचार्‍यांनी बॅलेट पेपरबाबत वरिष्ठांना विचारणा केल्यानंतर त्यांनी मतदानाच्या दिवशी बॅलेटपेपर पुरविण्यात येतील असले सांगितले होते.

परंतू मतदानाच्या दिवशी देखील पोलीस कर्मचार्‍यांना बॅलेट पेपर उपलब्ध न झाल्याने बंदोबस्तासाठी दुसर्‍या तालुक्यात गेलेेल्या हजारो पोलीस कर्मचार्‍यांना मतदानाचा हक्क बजाविता आला नाही.

कर्मचार्‍याने तरजरीवर शाई ऐवजी लिहिले ‘बंदोबस्त’

मतदानापासून वंचित राहिलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याने त्यांच्या डाव्या हाताच्या तरजरीवर शाई ऐवजी बंदोबस्त नाव लिहून तो फोटो व्हॉटस्अप स्टेटसवर शेअर करुन प्रशासनाविरुध्द नाराजी व्यक्त केली.

LEAVE A REPLY

*