आगामी सण,उत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर प्रतिबंधात्मक कारवाई

0
जळगाव |  प्रतिनिधी :  आगामी सण, उत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर कायदा हातात घेणार्‍यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षकांनी गुन्हे आढावा बैठकीत प्रभारी अधिकार्‍यांना दिला.

पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्या उपस्थितीत गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सर्व विभागाचे उपविभागीय अधिकारी, सर्व पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातीला जिल्हयातील दाखल व उघड झालेल्या गुन्हांच्या पोलिस अधिक्षकांनी आढावा घेवून गुन्हाचा निपटारा करण्याच्या सुचना दिल्या. तसेच अर्थिक गुन्हे शाखा व वरिष्ठ अधिकार्‍यांकडे असलेल्या आर्थिक गुन्हे निर्गती करण्याबाबत सुचना देण्यात आल्या.

त्याचप्रमाणे गंभीर गुन्हे, चोर्‍या, वाळू चोरी करण्यार्‍या बाबतीची माहिती संकलीत करून त्यांच्याविरुध्द एमपीडीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या. त्याचप्रमाणे पोलिस स्टेशनच्या हद्दीत वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश कराळे यांनी दिले.

तसेच सण, उत्सवाच्या पार्श्‍वभुमीवर गणेश मंडळ, शांतता कमेटीच्या बैठक, पोलिस मित्र बैठक, राजकीय पदाधिकार्‍यांची बैठक घेवून शांततेचे आवाहन करावे असे पोलिस अधिक्षकांनी प्रभारी अधिकार्‍यांना सांगितले.

LEAVE A REPLY

*