दुसर्‍याला मतदान झाल्याची तक्रार:   भुसावळला गुन्हा दाखल

0
 भुसावळ :  लोकसभेच्या निवडणुकीतील तिसर्‍या टप्प्याचे मतदान २३ रोजी पार पडले.चुकीचे मतदान झाल्याच्याची तक्रार कारणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही जिल्ह्यातील पहिली तक्रार असल्याची सांगण्यात आले.
 यात रावेर लोकसभा मतदारसंघ भुसावळ विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्र क्र.३५ रेल्वे नॉर्थ कॉलनी येथे सकाळी ९.३० वा. आरोपी अमोल रामदास सुरवाडे (वय २४, रा. चांदमारी चाळ) याने मतदानाचा हक्क बजावल्या नंतर माझे मतदान झाले नाही व व्हीव्ही पॅट मशिनवर मला वेगळे आणि अस्पष्ट दिसले असून मतदान दुसर्‍याला झाल्याचा आक्षेप घेतला. त्या नंतर मतदान केंद्र अधिकार्‍यांनी आपल्या अधिकाराचा वापर करुन ते मत तपासून पाहिले असता बरोबर निघाले.
मतदाराने मतदान झाले नसल्याचे खोटे सांगितले म्हणून मतदान केंद्राध्यक्ष योगेश दिलीप चौधरी वय २८ यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात ९४/१९ भादवी १७७, १७७(फ), लोकप्रतिनिधी कायदा १५१ कलम २६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पोलीसांच्या ताब्यात आहे. तपास पोउनि. नाना सूर्यवंशी करित आहे.
  दरम्यान, दुपारी ४ वाजेपर्यंत ४०.९१ टक्के मतदान शांततेत पार पडल्याची माहिती सुत्रांनी दिली.

LEAVE A REPLY

*