# Live Update # रावेर लोकसभेसाठी दुपारी 3 वाजेपर्यत 50.58 टक्के मतदान !

पाळणाघराची वणवा

0
रावेर|दि.२३I प्रतिनिधी : रावेर लोकसभेतील रावेर विधानसभा मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यत १ लाख 50 हजार 293 मतदान होऊन 50.58 टक्के मतदान झाले आहे.

सकाळी ७ वा तालुक्यात मतदानाला सुरूवात झाली. यावेळी विवरा बु,पातोंडी, निभोंरा बु,यावल,डोंगर कठोरा, अमोदे येथे २ गारखेडा,भालशिव,फैजपुर आदी ठिकाणी किरकोळ कारणांसाठी मतदान यंत्र बदलवण्यात आले. रावेरातील यशवंत विदयालयात मतदान केंद्र महीला सांभाळत असुन या केंद्राला सखी मतदान केंद्र संबोधित करण्यात आले आहे. तर सेक्टर ऑफीसर यांना देण्यात आलेल्या वाहनांवर जी.पी.एस. स्वंयचलित यंत्रणा कार्यान्वित केली असुन,त्याद्वारे संबंधित वाहनांवर निगा ठेवली आहे.

शहरातील महत्त्वाच्या केंद्रावर सेल्फी पांईट करण्यात आला असुन,याठिकाणी मतदार हक्क बजाऊन आल्यावर सेल्फी घेत आहे.तालुक्यातील विवरे बुर्दूक येथिल ८५ क्रंमाकाच्या केंद्रावर कॉग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी विवरे खुर्द येथे देखिल मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी युवकांनी त्यांच्या सोबत सेल्फी घेत प्रतिसाद दिला.

दुपारी १२.३०वा.रक्षा खडसे यांनी देखिल रावेरातील मतदान केंद्रावर जाऊन पदाधिकारी व मतदारांना भेटी दिल्या. यावेळी जि.प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पद्माकर महाजन, यशवंत दलाल आदी कार्यकर्ते उपास्थित होते. अनिल चौधरी यांनी देखिल त्यांच्या सौभाग्यवती व दोन्ही मुलांसह रावेर येथिल यशवंत विदयालयात मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार शिरिष चौधरी यांनी त्यांच्या सौ.डॉ. अरूणा चौधरी समवेत खिरोदा मतदान केंद्रावर मतदान केले.आमदार हरिभाऊ जावळे यांनी सपत्नीक भालोद येथे मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी ९ वा. रावेर विधानसभा श्रेत्रात २८ हजार ८६९ मतदारांनी मतदान केल्याने ९.७२ टक्के मतदान झाले होते. दुपारी ११ वा.७० हजार ८८२ मतदारांनी मतदान केले त्यामुळे २३.८५ टक्के मतदान झाले होते. दुपारी १ वा.१ लाख १४ हजार ३४९ मतदारांनी मतदान करून ३८.४८ टक्के मतदान झाले.

पाळणाघराची वणवा

रावेर विधानसभा श्रेत्रातील मतदार संघात पाळणाघर नसल्याने लहान मुलांनाही त्यांच्या आईसह रांगेत टाळकट रहावे लागले.

LEAVE A REPLY

*