Type to search

धक्कादायक … मलकापूर येथे मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान यादीत दाखविले मृत..

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

धक्कादायक … मलकापूर येथे मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदान यादीत दाखविले मृत..

Share
मलकापूर :  येथे मतदान केंद्रावर चक्क जिवंत मतदारांना मृतक दाखविल्याने एकच खळबळ उडाली आहे..तर मतदान केंद्रावर मृत दाखविलेल्या मृतांनी चक्क मृतांची अंतयात्रा काढली…ही अंतयात्रा मतदान केंद्रावरून उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयावर नेण्यात आली ही अंतयात्रा संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

आज 23 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकिचे मतदान तिसऱ्या टप्प्यात होणार असून रावेर मतदार संघात असलेल्या मलकापूर विधानसभा मतदार संघात असलेल्या बुथ क्रमांक 166 वर रोहिदास नगर मधील मतदार क्रमांक 521 नं.श्रीकृष्ण संपत शेकोकार,मतदार क्रं.640 मोहनसिंग चिंधु गणबास, दत्तनगर मधील मतदार क्रमांक 443सौ.रजनी दिनकर जोशी यांसह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखविल्याने एकच खळबळ उडाली.

तर ही वार्ता संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला आहे..याबाबत सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांचेशी संपर्क साधला असता समाधान कारक उत्तर न मिळाल्याने नगराध्यक्ष अँड हरीश रावळ,गजानन ठोसर, नगरसेवक राजु पाटील,अनिल बगाडे,अनिल गांधी यांच्या नेतृत्वात किशोर गणबास,अंकुश भोंबे,सुनिल बगाडे, गोपाल कावस्कर,भावसिंग धामोणे,नितीन परसे,विजय खिराडे,गोपाळ पठ्ठे, दिलीप काकडे(डि.के), मंगल गणबास,बुथ क्रमांक166 वरुन सहाय्यक निवडणूक अधिकारी(एस.डी.ओ)कार्यालयावर डफडे वाजवून अंतयात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावय काढण्यात आली.

अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकताच उपविभागीय पोलीस अधिकारी गिरीश बोबडे,शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले.नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादीत डिलीटेट दाखविल्याने तो मतदानापासुन वंचित राहत असल्याने मतदार याद्या अद्यावत करुन ‘त्या’ बुथवर पुर्नमतदान घेण्याची मागणी केली.प्रेतयात्रा काढणाऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!