पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा प्रश्न जटील

0
जळगाव । दि.25 । प्रतिनिधी-शहरात साफसफाई करण्यासाठी यंत्रणा राबविणार्‍या महापालिकेच्या कार्यालयातच अस्वच्छता दिसून आली. त्यामुळे काल उपमहापौर ललित कोल्हे यांनी मनपा इमारतीसह अन्य प्रभाग कार्यालयांमध्ये सफाई मोहिम सुरु करावी, अशी सूचना दिली होती.
त्यानुसार महापालिकेच्या सतरा मजली इमारतीत प्रत्येक मजल्यावर साफसफाई आणि रंगरंगोटीचे काम सुरु केले आहे. तसेच गिरणा टाकीवरील पाण्याची टाकीही स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आले असून टाकीतील शिवाळ आणि कचरा काढण्यात आला.

प्रभारी आयुक्त किशोरराजे निंबाळकर यांच्या सूचनेवरुन शहरात प्रभागनिहाय साफसफाईची मोहिम सुरु करण्यात आली आहे. परंतु साफसफाईची मोहिम राबविणार्‍या महापालिकेच्या इमारतीत व अन्य प्रभाग समिती कार्यालयांमध्ये तसेच पाण्याच्या टाक्या देखील अस्वच्छ असल्याचे पाहणीअंती उपमहापौर ललित कोल्हे यांच्या निदर्शनास आले.

त्यामुळे काल त्यांनी सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेवून सूचना दिली. दरम्यान, महापालिकेच्या सर्व मजल्यांवर साफसफाई मोहीम सुरु करण्यात आली आहे.

तसेच कार्यालयातील भिंती देखील थुंकल्यामुळे रंगल्या असल्यामुळे त्यावर रंगरंगोटी करण्यात येत आहे. गिरणा पाण्याची टाकी देखील प्रचंड अस्वच्छ असल्यामुळे स्वच्छ करण्याचे काम सुरुच करुन टाकीतील शेवाळ आणि कचरा काढण्यात आला. दरम्यान, नगरसेवक बंटी जोशी यांच्यासह अधिकार्‍यांनी सकाळी जावून पाहणी केली.

 

LEAVE A REPLY

*