Thursday, April 25, 2024
HomeजळगावVideo पारोळा : २० वर्षीय तरूणीचा मृत्यू

Video पारोळा : २० वर्षीय तरूणीचा मृत्यू

योगेश पाटील

पारोळा – Parola

- Advertisement -

तालुक्यातील टोळी येथील रहिवासी असलेल्या (20) वर्षीय तरुणीने काहीतरी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र या घटनेला वेगळे वळण लागले आहे.

यात पीडित मुलीचे मामा सुरेश देवराम पाटोळे यांनी फिर्याद दिली की त्या तरूणीस शिवनंदन शालीक पवार, पप्पू अशोक पाटील, अशोक वालजी पाटील यासह एक महिला अश्यानी काहीतरी गुंगीचे औषध देऊन तिला गाडीत टाकून कासोदा रस्त्याकडे नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करीत असताना तिने विरोध केल्याने एका महिलेने मला मारहाण करून चारही जणांनी जातिवाचक शिवीगाळ करून तिघे नराधमांनी आळीपाळीने बलात्कार करून तीस विषारी औषध पाजून फेकून दिले त्यानंतर तिला पारोळा कुटीर रुग्णालयात

वेळीच क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी दाखल केले तेथे प्रथमोपचार करून तिला दिनांक 8 रोजी धुळे येथे हलविण्यात आले.

तेथे तिचा उपचारादरम्यान दिनांक 10 रोजी पहाटे 4 वाजता प्राणज्योत मालवली,दरम्यान दलित मुलीवर अन्याय झाल्याची बातमी पसरताच राष्ट्रीय चर्मकार महा संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे,राष्ट्रीय सदस्य पांडुरंग बाविस्कर, जिल्हा अध्यक्ष उत्तम नाना मोरे, तालुका अध्यक्ष लक्ष्मण महाले, युवा अध्यक्ष मंगेश मोरे,चर्मकार संघाचे पिरणकुमार अनुष्ठान, नगरसेवक दीपक अनुष्ठान, गौतम वानखेडे, वीरेंद्र सरदार, यासह धुळे, अमळनेर, एरंडोल पारोळा येथील विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मयत निलिमाच्या नातेवाईक मामा सुरेश पाटोळे, बहीण हर्षाली संजय सावंत यांनी आमच्या चिमुकल्या मुलीवर अन्याय झाला आहे गुन्हा दाखल करून आरोपीना अटक करत नाही तोवर आम्ही मुलीचा अंत्यसंस्कार करणार नाही असा निर्णय घेतल्याने पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून एका जनाला ताब्यात घेतले आहे.

तर एक जण मुख्य संशयित यानेही काल दिनांक 9 रोजी केलेल्या कृत्याला घाबरून जाऊन विषारी औषध सेवन केले होते त्यासही धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्याजवळ बंदोबस्तासाठी दोन पोलीस ठेवण्यात आले आहेत म्हणजे तोही पोलिसांच्या ताब्यात आहे इतर आरोपीच्या शोधार्थ पथक रवाना करण्यात आले आहेत. याघटनेचा पुढील तपास डी वाय एस पी जाधव करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या