Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

# LiveUpdate # पारोळा शहरात पहिल्या चार तासात २६ टक्के मतदान

Share
योगेश पाटील | पारोळा : पारोळा येथे लोकसभा निवडणूकीसाठी सुरू झालेल्या मतदानाच्या पहिल्या चार तासात २६ टक्के मतदान झाले आहे.

पारोळा शहरातील न पा चौकातील मराठी शाळा 2 येथे सर्व सुशिक्षित मतदारांनी सकाळीच रांगा लावल्या होत्या तर याठिकाणी ११ वाजेपर्यंत २६% मतदान झाले होते. अपंग,वृद्ध लोकांनी आपला मतदानाचा हक्क या बुथवर मोठ्या संख्येने बजावला हे विशेष.

 

धाबे ३०७ आता पर्यंत ६० टक्के मतदान.

न्हावी, ता. यावल
न्हावी येथे मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअमरन शरद महाजन यांंनी सहकार्‍यांसह मतदान केले.

चाळीसगावला सखी मतदान केंद्राचे आकर्षण

चाळीसगावला महिला मतदारांना मतदानासाठी प्रेरीत करण्यासाठी येथे खास सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. प्रवेशव्दारापासून तर मतदान कक्षापर्यंत गुलाबी रंगाच्या कनाती, गुलांबी पांढर्‍या रंगाचे फुगे लावून केंद्र सजविले होते. त्यामुळे अनेक मतदारांचे लक्ष या केंद्राने वेधले होते.

रावेर
रावेर लोकसभेचे उमेदवार डॉ.उल्हास पाटील यांनी विवरे येथे मतदान केले.

जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले परिवारासह मतदान

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पत्नी साधना व दोन मुलींसोबत मतदानाचा हक्क बजावला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!