रावेरच्या केळीला अरब राष्ट्रात मागणी वाढली : रोज 15 कंटेनर होतात रवाना

0
रावेर । चंद्रकांत विचवे :  पाकिस्तानातून येणार्‍या फळाच्या ट्रक मधून अवैधरित्या शास्त्रात्रे,अमली पदार्थ,व चलनी नोटा येत असल्याने,सरकार कडून एल.ओ.सी.सह अन्य तिन्ही सीमा बंद केल्याने पाकिस्तानातील केळी निर्यात बंद झाल्याने केळी भावाच्या वाढीला काही अंशी ब्रेक लागला आहे.

मात्र दुसरी बाजू अरब राष्ट्रातून केळी मागणी वाढल्याने आता दरोरोज रावेर तालुक्यातील 15 कंटेनर केळी समुद्रमार्गे रवाना होत आहे. यासाठी 150-250 रुपये जादा रक्कम मोजून शेतकर्‍यांची केळी खरेदी होत आहे.

खान्देशात केळी कापणी सुरु झाल्याने दरोरोज केळी भावात वाढ होत आहे.12 एप्रिल पासून केळी भावाचा वाढता आलेख असल्याने,रावेर बाजार समितीने रविवारी 20 रुपयांनी केळी भावात वाढ केली आहे.नवती 1081 व 14 चा फरक तर पिलबाग 1000 व 14 चा फरक,वापसी 620 असे भाव काढले आहे.पुलवामा हल्यानंतर खान्देशातील केळी निर्यात पाकिस्तानात बंद झाली होती

.आता काही दिवसापूर्वी परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने केळी निर्यात सुरु झाली मात्र 18 एप्रिल रोजी पाकिस्तानातून येणार्‍या ट्रक मध्ये अवैध शस्त्र,अमली पदार्थ व चलनी नोटा आढळून आल्याने,याची गंभीर दखल घेत एल.ओ.सी.सह अन्य तिन्ही सीमा निर्यात व आयतीसाठी बंद करण्यात अल्या आहे.या ठिकाणाहून खान्देशातील केळी ला दरोरोज 30 कंटेनर केळी मागणी होती .ि नर्यातबंदी उठली तर रावेर तालुक्या-तील केळी उत्पादकांना मोठा दिलासा मिळून केळी भावात अजून 30 रुपयांनी वाढ होईल अशी अपेक्षा केळी उत्पादकांना आहे.

पाकिस्तानातील केळी बंद असली तरी सुमुद्रमार्गे दरोरोज 15 कंटेनर अफगाणिस्थान व इराण देशात रवाना होत असल्याने केळी भावाला सुगीचे दिवस आले आहे.

केळीभाव 30 रुपयांनी वाढतील

पाकिस्तानातून येणार्‍या वाहनामध्ये अमलीपदार्थ व अन्य अवैध शस्त्रसाठी सापडल्याने पाकिस्तानातील केळी निर्यात बंद झाली आहे. त्यांच्या कडून येणार्‍या वाहनाची कसून तपासणी करून त्याना आत घेतले पाहिजे,पाकिस्तानातून दरोरोज 30 कंटेनर इतकी मागणी होत आहे.

पण बंदी आल्याने वाहतूक बंद आहे.वाहतूक सुरळीत झाली तर केळी भाव 30 रुपयांनी वाढतील.आता अफगाणीस्तानात केळी जहाजा मार्गे जात आहे,वाहतुकीला 15 दिवसाचा कालावधी लागत असल्याने यात मोठ्या प्रमाणात केळी माल खराब होवून नुकसान होत आहे.यासाठी पाकिस्तान मार्गे वाहतूक सुरळीत होणे गरजेचे आहे.
-प्रेमानंद महाजन,तांदलवाडी.ता.रावेर

जादा भावाने कापणी

7 मे पासून रमजानला सुरवात होत असल्याने अरब राष्ट्रातून केळीला प्रचंड मागणी होत आहे.पाकिस्तनात जाणारी केळी निर्यात बंद झाली असली तरी समुद्रामार्गे दररोज 15 कंटेनर अफगाणिस्तान व इराण मध्ये जात आहे. यासाठी केळी भावापेक्षा 150 पर्यंत जादा भाव देवून केळी कापणी केली जात आहे.
-किशोर गनवाणी,केळी व्यापारी,रावेर

LEAVE A REPLY

*