Type to search

Breaking News maharashtra देश विदेश मुख्य बातम्या

न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा कट : न्या. रंजन गोगोई

Share
दिल्ली : माझ्यावरील आरोप केवळ माझ्यापुरते मर्यादित नसून या देशाची न्यायव्यवस्था अस्थिर करण्याचा व्यापक कट आहे असं स्फोटक विधान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी केलं आहे. एका ३५ वर्षांच्या महिलेने सरन्यायाधीशांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला असून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. याप्रसंगी न्यायव्यवस्था धोक्यात असल्याची भीती गोगोई यांनी व्यक्त केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या २२ न्यायाधीशांना पत्र लिहून गोगोई यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. यावर आज सुटीचा दिवस असूनही सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी सुरू आहे. आपली बाजू मांडताना गोगोई म्हणाले, ‘२० वर्ष सचोटीने न्यायव्यवस्थेची सेवा केली त्याचा हा इनाम मला मिळतो आहे. माझी संपत्ती फक्त ६ लाख ८०,००० रुपये आहे. कोणत्याही पैशाच्या घोटाळ्यात मला अडकवू शकत नाहीत म्हणून त्यांनी हा मार्ग निवडला आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी मला १० तासांहूनही कमी वेळ देण्यात आला आहे. खरोखर या देशाची न्यायव्यवस्था धोक्यात आहे हे सांगण्याची वेळ सरन्यायाधीशावरच आली आहे.’

आरोप करणाऱ्या महिलेची वागणूक आधीपासूनच आक्षेपार्ह असून तिला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचा दावा करत न्या. रंजन गोगोईंनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ‘येत्या काही आठवड्यांमध्ये मी काही महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणार आहे. त्यामुळेच मला अडकवलं जातं आहे.’

राहुल गांधींवरील भ्रष्टाचाराचे आरोप, पंतप्रधान मोदींच्या आयुष्यावरील चित्रपट, तामिळनाडू निवडणुकांदरम्यान झालेला भ्रष्टाचार या प्रकरणांवर पुढच्या आठवड्यात गोगोई सुनावणी करणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!