Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

इगतपुरी स्थानकावर रेल्वेचा आजपासून ब्लॉक

Share
भुसावळ । प्रतिनिधी :  मध्य रेल्वेत फलाटांचे काम, पादचारी पुल काढणे तसेच इगतपुरी स्थानकावर विशेष वाहतुक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आसल्याने काही गाड्या रद्द, काहींच्या मार्गात बदल तर काही गाड्या नियमित करण्यात आल्या आहे.

रद्द गाड्या- दि.19 व 20 एप्रिल रोजी पहाटे 3.45 ते 8.4 वाजेदरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. त्यात गाडी क्र.51154/51153 भुसावळ-मुंबई फास्ट पॅसेंजरचा समावेश आहे.

नियमित करण्यात आलेल्या गाड्या- दि.20 रोजी गाडी क्र. 11067 एलटीटी फैजाबाद एक्सप्रेस व गाडी क्र.21067 एलटीटी -रायबरेली एक्सप्रेस 7.14 ते 8.35 वाजता कसारा. गाडी क्र.12859 गीतांजली एक्सप्रेस खरडी स्थानकावर सकाळी 7.51 वते 8.30 वाजता. गाडी क्र.17617 तपोवन एक्सप्रेस अटगाव स्थानकर सकाळी 7.53 ते 8.45 वाजता. गाडी क्र. 15645 एलटीटी- गुवाहटी एक्सप्रेस, गाडी क्र. 12534 पुष्पक एक्सप्रेस आपल्या निर्धारित वेळेच्या 45 मिनिटे उशीराने इगतपुरी स्थानकावर पोहचतील.

दि.20 व 21 रोजी ब्लॉक – ब्लॉकमुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. यात दि.20 रोजी गाडी क्र. 51114 भुसावळ- मुंबई फास्ट पॅसेंजर. दि.21 रोजीची गाडी क्र. 51153 मुंबई-भुसावळ फास्ट पॅसेंजर, गाडी क्र. 12117/12118 गोदावरी एक्सप्रेस, गाडी क्र. 22102/22101 मनमाड -मुंबई राज्यराणी एक्सप्रेस, गाडी क्र. 11025/ 11026 हुतात्मा एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.

मार्गात बदल- दि.21रोजी गाडी क्र.22129 एलटीटी- अलाहाबाद तुलसी एक्सप्रेस व गाडी क्र.12859 गीतांजली एक्सप्रेस दिवा, वसईरोड, जळगाव मार्गे धावणार आहे.

एक्सप्रेस नियमित- दि. 21 रोजी गाडी क्र.15017 एलटीटी- गोरखपुर एक्सप्रेस कसारा स्थानार सकाळी 8.34 वा. ते 11.10 वा.नियमित करण्यात येईल. गाडी क्र.12336 एलटीटी-भागलपुर एक्सप्रेस खरडी स्थानकार सकाळी 9.41 ते 11 वा. नियमित करण्यात येईल.

दि.21 रोजी गाडी क्र.12519 एलटीटी -कामाख्या एक्सप्रेस एलटीटी स्थानकावरुन निर्धारित वेळ सकाळी 7.50 ऐवजी 9 वाजता रवाना होईल.

अर्ध्यामार्गातून परत- दि.20 रोजी गाडी क्र.12140 सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक स्थानकापर्यंत चालविली जाईल. दि.21 रोजी 12139 सेवाग्राम एक्सप्रेस नाशिक रोड स्थानकावरुन सोडण्यात येईल. प्रवाशांनी हा बदल लक्षात घेवून प्रवासाचे नियोजन करणे तसेच रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!