# Video # देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य : रावेरच्या विजय संकल्प प्रचार सभेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

शेळगाव बरेजसाठी सातशे सत्तर कोटी  मंजूर

0
रावेर  | प्रतिनिधी :  भारतात अनाचारी,दुराचारी, भ्रष्टाचारी राजवट कॉंग्रेसने दिली, पाच वर्षात मोदीने पारदर्शी व प्रामाणिक व सबका साथ व सबका विकास सांगत शेवटच्या माणसाचा विकास साधला . भारताच्या सैन्यावर हल्ला झाल्यावर मोदिजीनी अवघ्या काही तासात बदला घेवून पाकड्याना धडा शिकवला,यासाठी फैसला करण्याची घडी आहे. हा देश कुणाच्या ताब्यात द्यायचा? ५५ वर्ष कॉंग्रेसने राज्य केल, पणजोबा, आजी आता नातू गरिबी हाटवणार असल्याचा नारा दिला आहे. पाच वर्षात मोदिनी ३४ कोटी लोकांना जनधन योजनेतून बँकेचे खाते दिल. या खात्यात ८० हजार कोटी रुपये मोदीने पाठवले. दलाल नाही, मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही, सर्व योजनाचा पैसा थेट खात्यात पाठवण्याचे काम मोदिनी केले आहे. कॉंग्रेसने नेहमी देशाला लुटले आहे. आता देशाला मजबूत नेतृत्व देण्यासाठी नरेद्र मोदीच योग्य असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेस वर घणाघाती हल्ला चढवला
  शुक्रवारी रावेर येथील शिवप्रसाद नगर या ठिकाणी रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेला ते संबोधित करत होते.यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
सुरवातीला मलकापूर येथील आमदार चैनसुख संचेती,रावेर चे आमदार हरिभाऊ जावळे,उमेदवार रक्षा खडसे,सहकार मंत्री गुलाबराव पाटील,जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी भाषणे दिली.मुख्यमंत्री यांनी पुढे बोलताना सांगितले कि, पूर्वी देशात ४५ टक्के लोकांकडे शौचलाय होत,आता पाच वर्षात देशात ९८ टक्के लोकांकडे शौचालय आहे.
उजाला योजनेतून घरोघरी वीज आणि उज्वला योजनेतून गॅॅस दिला.प्रधानमंत्री आवास योजनेतून प्रत्येकला घर देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे.यात १० लाख लोकांना घर देणार आहे.पाच लाख पर्यत मोफत आरोग्यसेवा देण्याच्या निर्णयाने ५० कोटी लोकांना लाभ दिला आहे.असंघटीत कामगारांना पेन्शन योजना लागू केली.जळगाव जिल्ह्यातील शेतकर्यांना दुष्काळी,पिक विमा,आदी मदतीतून दोन हजार ३०० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याच काम केल.८२ लाख पैकी ७२ लाख शेतकर्यांच्या खात्यात दुष्काळी अनुदान जमा केले आहे.
अनेक प्रोजेक्ट नाथाभाऊंनी आणले, आघाडी सरकारच्या १५ वर्षात ते प्रकल्प बंद पडले ते सुरु करण्यासाठी आता गिरीशभाऊ ना जबाबदारी सोपवली आहे. आता हे प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. शेळगाव बरेजसाठी सातशे सत्तर कोटी  मंजूर केले. ७ आजूबा असलेली मेगा रिचार्ज प्रकल्पसाठी हरिभाऊनी मागणी केली, हरीभाऊ तुम्ही काळजी करू नका या योजनेच्या भूमी पूजनासाठी मोदीजी येतील असे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
    गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या भाषणातून कॉग्रेस व राष्ट्रवादीचा खरपून समाचार घेतला,एकीकडे ५६ पक्ष एकत्र आले आहे आणि समोर एकटा ५६ इंच सिनेवाला नरेंद्र मोदिजी आहे.रक्षा ताई समोरील उमेदवार सिजनेबल आहे.ते सक्सेस होणार नाही.त्यांना गोदावरीतच जावे लागेल अशी जिव्हारी टीका त्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार उल्हास पाटील यांच्यावर केली.
भाजपा सेनेच्या युतीबाबत ते म्हणाले कि आमच लव-मँँरेज,नवरा कोन आणि नवरी कोन हे कळेलच,आमची युती स्व.बाळासाहेब व प्रमोदजी महाजन यांनी केली आहे.ते अतूट आहे.पण या कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकार काही कळत नाही.देशाला सक्षम नेतृत्वाची गरज आहे.यासाठी मोदीच पंतप्रधान होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.गिरीश महाजन यांनी त्यांच्या भाषणातून सर्वाधिक मताधिक्क्य जामनेर मतदार संघातून देणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे,आ.हरिभाऊ जावळे,व रक्षा खडसे यांनी देखील मनोगते व्यक्त केली.आ.संजय सावकारे,आ.चैनसुख संचेती,अशोक कांडेलकर,जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,सभापती माधुरी नेमाडे,सुरेश धनके,श्रीकांत महाजन,पी के महाजन,पद्माकर महाजन,रमेश मकासरे,मनोज बियाणी,विजया रहाटकर,अमोल पाटील,जितु पाटील,वासू नरवाडे,व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. आभार नंदू महाजन यांनी मानले.

LEAVE A REPLY

*