LOADING

Type to search

# Video # हि निवडणूक देशाच्या अस्मितेची : अमळनेरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

# Video # हि निवडणूक देशाच्या अस्मितेची : अमळनेरच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणविस

Share
अमळनेर| प्रतिनिधी :  जिल्ह्यात २३०० कोटी रू शेतकऱ्यांसाठी कर्ज माफीची रक्कम दिली. भिषण दुष्काळ असतांना मदती सोबत विकासाची कामे यूतीच्या सरकारने केली आहे. हि निवडणूक देशाच्या अस्मितेची असून भारतीयांचा मान सन्मान स्वाभिमान सुरक्षीत ठेवण्यासाठी पून्हा एकदा केंद्रात मोदी सरकार येण्यासाठी भाजपा शिवसेना रिपाई महायूतीचे ऊमेदवार ऊन्मेश पाटील यांना विजयी करा असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणविस यांनी केले.

भाजपा ऊमेदवाराच्या प्रचारार्थ राज्याचे मूख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रिय मंत्री एम. के. पाटील, माजी आ. चिमणराव पाटील, जि. प. अध्यक्षा ऊज्वला पाटील, जिल्हाध्यक्ष ऊदय वाघ, ना. गिरिष महाजन, ना. गुलाबराव पाटील, आ. शिरिष चौधरी, आ. स्मिता वाघ, पारोळा नगराध्यक्ष करण पवार , नगराध्यक्षा पूष्पलता पाटील. माजी आ. साहेबराव पाटील, हिरा ऊद्योग समूहाचे डॉ रविंद्र चौधरी, यूतीतील सहयोगी सर्व पक्षाचे पदाधिकारी यावेळी ऊपस्थित होते.

अत्यंत आवेशपूर्ण भाषणातून ना. फडणविस यांनी विरोधकांचा समाचार घेत केंद्रातील मोदी सरकारच्या योजनांची माहिती व तिचे फायदे सांगीतले. देशद्रोही कलम रद्द केल्याने काय होवू शकते हे सांगतांना त्यांनी ऊपस्थितांमध्ये आवेश निर्माण केला. सभेला भर ऊन्हातही प्रचंड गर्दी होती.

भाजपातील मागील आठवड्यात झालेल्या व्यासपिठावरील राड्याची घटना लक्षात घेता पोलीस यंत्रणा सजग मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता.

मूख्यमंत्री ना फडणविस१ वा २५ मिनटांनी व्यासपिठावर ले १ वा ५० मिनटांनी भाषणाला सुरूवात झाली ३० मिनटांच्या भाषणात त्यांनी पूलवामाता बदला सर्जिकल स्ट्राईक मोदी सरकारने पाकीस्तानला वठणीवर आणण्यासाठी सैनाला दिलेली सूट या मूद्द्यांसह विविध योजनांबाबत माहिती सांगीतली.

तर तालूक्याच्या अस्मितेचा प्रश्न असलेला पाडळसरे धरण प्रकल्प हा राज्याचे जलसंपदा मंत्रीच पूर्ण करतील असे सांगून पाडळसरेचे ओझे नी महाजन यांचेकडेच टोलवले त्यांच्ये भाषणापूर्वी ऊमेदवार ऊन्मेष पाटील,ना गुलाबराव पाटील आ शिरिष चौधरीआ स्मिता वाघ यांनी मनोगतातून पाडळसरे नार पार सहमाळन नदी व नदी जोड प्रकल्पाचे कामांचे मूद्दे ऊपस्थित करून विकासा करिता अमळनेर तालूका दत्तक घेण्याचे आवाहन केले सूत्रसंचलन शरद सोनवणे यांनी केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!