विराटच्या बेंगळुरूसाठी आज ‘जिंकू किंवा मरू’

0
कोलकाता : आयपीएलच्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत ८ सामन्यांतील ७ सामने गमावणारा विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ ‘जर-तर’च्या फेऱ्यात अडकला आहे. या स्पर्धेतील स्थान टिकवून ठेवण्यासाठी बेंगळुरूला आज कोलकाता नाईट रायडर्सला कोणत्याही परिस्थितीत पराभूत करावं लागेल.

कोलकाता सलग तीन सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे. गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यामुळं कोलकाताला नमवून स्पर्धेतील आव्हान कायम राखण्याची नामी संधी बेंगळुरूकडे आहे. कोलकाताचा स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल जायबंदी झाला आहे.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यातही तो पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. त्यामुळं पहिल्यांदाच चांगली कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला होता. रसेलनं बेंगळुरूविरुद्ध मागील सामन्यात १३ चेंडूंमध्ये ४८ धावा कुटल्या होत्या. त्या जोरावर २०६ धावांचं आव्हान गाठलं होतं.

प्ले ऑफचं गणित

प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी कोलकाताला उर्वरित सहापैकी चार सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. त्यातील तीन सामने हे ईडन गार्डन मैदानावर होणार आहेत. बेंगळुरूचे स्टार फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स चांगली कामगिरी करत आहेत.

मात्र, सांघिक कामगिरी चांगली होऊ शकली नाही. बेंगळुरूच्या गोलंदाजांनी हवी तशी कामगिरी केलेली नाही. कोलकाताच्या गोलंदाजांनीही सरासरी कामगिरी केली आहे.

LEAVE A REPLY

*