वादळी वार्‍यामुळे दीड कोटीचे नुकसान

0

जळगाव / जिल्ह्यात काल दि.7 रोजी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जिल्ह्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वार्‍यामुळे आणि पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली होती. चाळीसगाव येथे दोन जणांचा वीज पडून मृत्यू देखील झाला.

एरंडोल तालुक्यात भातखेडे, ताडे, उत्राण, कासोदा, बाह्मणे, आडगाव या गावांमध्ये गारपीट झाल्याने लिंबू पिकाचे नुकसान झाले.

यावल तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर गारपीट होवून 10 गावांमधील केळी आणि मका या पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे.

तसेच जळगाव तालुक्यात नांद्रा बु। येथील नरेश नवाल यांच्यासह 10 ते 15 शेतकर्‍यांच्या शेतातील केळी जमिनदोस्त झाली. तसेच घरांचे देखील नुकसान झाले आहे.

या चारही तालुक्यांमध्ये सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनातर्फे वर्तविण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*