बामणोद येथे अपघातात महिला ठार  

0
बामणोद ता यावल | दि. १६| प्रतिनिधी :  येथे सकाळी सव्वा पाच वाजता लुम्बिनी नगर वनोली फाट्यावर इंदूबाई नारायण पाचपांडे या  ६८ वर्षीय महिला अपघातात जागीच ठार झाल्याची घटना घडली त्यामुळे आजची पहाट बामणोदकारांसाठी हादरवणारी ठरली.

गावाचे जवळच असलेल्या गोपाळ फिरके यांचे शेतात इंदूबाई पाचपांडे व सून सीमा पाचपांडे शेतात पापड करण्यासाठी जात असतांना लुम्बिनी नगर जवळ वनोली फाट्याजवळ मागून ट्रक HR 73 9909 येत असल्याने दोघीजणी थांबल्या मात्र पुढच्या वळणाचा अंदाज न आल्याने ट्रक सरळ एका महिलेला उडवत निघाला ,त्यात चेहऱ्यावर जबरजस्त मार लागल्याने महिला जागीच ठार झाली.

तर अचानक झालेल्या घटनेने सून सीमा पाचपांडे हादरून गेल्या, ट्रक किमान पन्नास फुट अंतरावर जाऊन थांबला आणखी थोडा पुढे गेला असता तर देविदास केदारे यांचेही जीवावर बेतले असते कारण त्यांची खाट देखील निम्मे ट्रकचे खाली आली होती.सुदैवाने ते बचावले. घटना घडताच ट्रक चालक लगेच फरार झाला.

सकाळी सकाळी झालेल्या घटनेने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी स पो नि दत्तात्रय निकम, सहकारी विजय पाचपोळ सह तात्काळ घटना स्थळी हजर झाले.व परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही.

सुदैवाने मोठा अपघात टळला 

ट्रक जेव्हा महिलेला उडऊन सरळ निघाला त्याच जागेवर उन्हाळ्याचे दिवस असल्याने आठ ते दहा खाटा टाकून मोकळ्या जागेवर ग्रामस्थ झोपलेले असतात.मात्र थोड्यावेळा पूर्वी पावसाचे थेंब सुरु झालेने येथे झोपलेले लोक घरात गेले आणि काही वेळातच हि घटना घडली त्यामुळे सुदैवच म्हणावे लागेल.

या बाबत फैजपूर पोलिसात ३२/२०१९ नुसार गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास स पो नि दत्तात्रय निकम, सहकारी विजय पाचपोळ करीत आहे.

LEAVE A REPLY

*