रेल्वे सप्ताहात भुसावळ विभागाला 5 शिल्ड

0
भुसावळ । प्रतिनिधी :  सर्वच कर्मचार्‍यांच्या उकृष्ट कार्याबद्दल विभागाला 5 शील्ड मिळाल्या आहेत. यापुढे ही कर्मचार्‍यांनी अधिक चांगले कार्य करुन यापेक्षा अधिक शिल्ड आणि पारितोषिक आपल्या विभागाला मिळवून देण्यासाठी कर्मचार्‍यांनी प्रयत्न करावा अस आवाहन डिआरएम आर.के. यादव यांनी केले.

ते येथील डिआरएम कार्यालयात 64 व्या रेल्वे सप्ताहात भुसावल विभागाला सिक्रुरिटी डिपार्टमेंट, कार्मिक डिपार्टमेंट, इंजीनियरिंग डिपार्टमेंट, पी.ओ.एच. वर्कशॉप आणि पूर्ण मध्य रेलवे मध्ये नाशिक रेलवे स्थानकाला स्वछता स्टेशन पारितोषिक प्राप्त झाले. या पुरस्कार व अधिकार्‍यांचे येथील डिआरएम कार्यालयात कौतुक केले. या पुरस्कारांची वितरण दि. 13 रोजी मुंबई येथील वतराव चव्हाण सभागृह, नरीमन पॉइंट मुंबई येथे वितरित करण्यात आले.

या प्रसंगी एडीआरएम मनोज सिन्हा, वरिष्ट मंडळ कार्मिक अधिकारी एन. डी. गागुर्डे, वरिष्ट मंडल वाणिज्य प्रबंधक आर. के. शर्मा, मंडल सुरक्षा आयुक्त राजीव दीक्षित,वरिष्ट मंडल अभियंता राजेश चिखले, वरीष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी एन. के. अग्रवाल, वरिष्ठ मंडळ विद्युत अभियंता प्रदीप ओक आणि सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*