कारागृह अधिक्षकांना जळगावात ‘नो एन्ट्री’

0

जळगाव / 2 हजाराची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले कारागृह अधिक्षक डी.टी.डाबेराव आणि बापू आमले या दोघांना जिल्हा न्यायालयात न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

दरम्यान, डाबेराव यांचा 2 लाखाच्या तर आमले यांचा 25 हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. तसेच डाबेराव यांना जळगावात रहिवास करण्यास बंदी घालण्यात आली.

संशयित आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी कारागृह अधीक्षक डी.टी.डाबेराव व बापू आमले या दोघांना दोन हजारांची लाच घेतल्याप्रकरणी दि.5 मे रोजी अटक केली होती.

याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेले डी.टी.डाबेराव व बापू आमले यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

या अर्जावर न्या.के.पी.नांदेडकर यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली. दरम्यान, डाबेराव यांचा 2 लाखाच्या तर आमले यांचा 25 हजाराच्या जातमुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.

डाबेराव आणि आमले यांनी लाचलूटपत प्रतिबंधक कार्यालयात दर शुक्रवारी हजरी लावावी. तसेच डाबेराव यांना जळगावात राहण्यास बंदी करण्यात आली असून जेव्हा सुनावणीची तारीख असेल त्याचवेळी जळगावात यावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहे.

सरकारतर्फे अ‍ॅड.मोहन देशपांडे तर आरोपीतर्फे अ‍ॅड.अकील इस्माईल, अ‍ॅड.राशीद पिंजारी यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

*