Type to search

तिन महिन्याच्या बाळाच्या आईसह नववधूवरांनी केले श्रमदान

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

तिन महिन्याच्या बाळाच्या आईसह नववधूवरांनी केले श्रमदान

Share
अभयसिंह राजपूत  | फत्तेपूर, ता. जामनेर :  तीन महिन्याच्या बाळासह नववधुवरांनी वर्‍हाडी मंडळींसह गाव पाणीदार करण्यासाठी सुमारे दोन तास श्रमदान केले. तीन महिन्यांच्या बाळंतीनीने आणि नववधुवरांसह सर्व वर्‍हाडी मंडळींनी केलेल्या सामुहिक श्रमदानामुळे गावकर्‍यांचा उत्साह दुणावला.

येथून जवळ असलेल्या चिंचोली – पिंप्री गावाने पाणी फाऊडेशनच्या सत्यमेव जयते वाटर कप या स्पर्धत भाग घेवून गाव जल युक्त करण्याचा निर्धार करून दि. 8 एप्रिल च्या मध्यरात्रीपासून श्रमदानाच्या कामाला प्रारंभ केला. पहिल्याच दिवशी 1135 लोकांनी सहभाग नोंदवून दाखवून दिले की, आम्हीच या स्पधेचे मानकरी ठरणार आहे. या दिवसांपासून गाव श्रमदानाच्या कामात दिवसे दिवस आघाडी घेतांना दिसत आहे. गावांतील प्रत्येक घटक श्रमदानाच्या पुण्याच्या कामाला येत आहे . दररोज जवळ पास 500 लोक श्रमदानाच्या ठिकाणी येवून श्रमदान करीत आहे.

सर्व गाव श्रमदान करत असल्याचे पाहत अनेकांनी श्रमदान करण्याची स्वतःहून इच्छा प्रगट केली आहे. गावातील एका महिलेस श्रमदान करण्याची इच्छा प्रगट केली. परंतु तिला तीन महिन्याचे छोटे बाळ असल्याने तिला बाहेर श्रमदानासाठी निघता येत नव्हते. गावांतील महिलां पुरुषाचा उत्साह पाहून 22 वर्षिय या महिलेने तीन महिन्याचे बाळ घेवून श्रमदानास निघाली. सर्वाना नवल वाटले.

एका झाडाला कपडयाचा झोका करून त्यात तीन महिन्यांचे बाळ टाकले आणि ही रणरागिनी श्रमदान करण्यास आली. हे संपूर्ण चित्र सरपंच विनोद चौधरी यांनी पाहिले आणि त्यांनी ठरविले की,ही माता जोपर्यंत काम करेल तोपर्यंत मी स्वतःतिच्या बाळाचा सांभाळ करेल. आणि चक्क या महिलेने दोन तास श्रमदानाचे काम केले. या दोन तासात त्या बाळाला सरपंच विनोद चौधरी यांनी साभाळले.

45 दिवस चालणार श्रमदान

दि.8 एप्रिल पासून श्रमदानाला प्रारंभ झाला आहे. 45 दिवस हे श्रमदान चालणार आहे. प्रत्येक दिवशी नव नविन पाहायला मिळते. दि.13 एप्रिल रोजी गावातील तडवी समाजातील सुरज शरीफ तडवी या तरुणाचे लग्न होते. हे लग्न सावळद बारा ता, सोयगाव येथे लागण्यासाठी गेले. चार वाजेला लग्न लागून सर्व वर्‍हाडी व वधु वर गावांत आले. तेव्हा सुरज तडवी यांने सर्वाना विनंती करून श्रमदानासाठी घेवून गेला. नववधू , नववर व सर्व वर्‍हाळी मंडळी आदीनी श्रमदान करून आपआपल्या घरी गेले. सर्वत्र याच लग्नाची व सुरज तडवी ने केलेल्या लग्नाच्या दिवशी श्रमदानाची चर्चा सुरू आहे.

रोज 500 गावकरी करताहेत श्रमदान

दररोज गावांतील 500 लोक श्रमदान करणेसाठी येतात. यासाठी लागणारे साहित्य त्यानां पिण्याचे पाणी, जेवनाचे डबे आणणे, विविध कामे सरपंच व त्यांचे सहकारी नित्याने करित आहेत. घरातील आईवडील श्रमदानासाठी आले तर त्यांच्या सोबत लहान मुले, मुली सोबत येत आहेत. आई -वडीलाचे काम पाहून तेही हातात फावडे , टिकाव, टोपली घेवून कामे करीत आहेत. या लहान मुलाचे कौतूक याप्रसंगी होत आहे.

प्रत्येक घरातील घरातील माणूस श्रमदानासाठी येत आहे. घरातील म्हतारे माणसे सुद्धा श्रमदान करताना दिसत आहे. या गावांची तयारी, गावकर्‍याचा निर्धार, कामाची पध्दत, नव नविन उपक्रम , कोणालाही लहान मोठे न समजता ज्याचा मान त्याला देवून सर्व गांव एकत्र येवून गाव जलमय करणेसाठी रात्र -दिवस धडपड करतांना पाहून अनेक दात्यानी खुल्या हाताने या फाऊडेशनसाठी आर्थीक मदत करीत आहेत. अशा एकजुट असणार्‍या गावांचा खरोखर पहिलाच क्रमांक येईल असे संपूर्ण तालुक्याचे मत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!