तोतया उपजिल्हाधिकार्‍याचा फेसबुकवरुन अधिकार्‍यांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न

0
जळगाव । दि.21 । प्रतिनिधी-उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी करणार्‍या तोतया उपजिल्हाधिकार्‍यांचा डीवायएसपी सांगळे यांनी पर्दाफाश केला आहे.
फेसबुक खात्याच्या प्रोफाईलमध्ये शासनाचा शासकीय लोगोचा वापर करून स्वताची माहिती राज्याचा सनदी अधिकारी असलेची बतावणी करून जवळीक साधण्याचा प्रयत्न या तोतया अधिकार्‍यांना केला असल्याची माहिती तपासात पुढे आली असल्याची माहिती पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे, डीवायएसपी सचिन सांगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलिस मुख्यालयात असलेल्या महिला सहाय्यता कक्षात सुरु करण्यात आले आहे. याठिकाणी पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद सोडविले जातात.

या ठिकाणी सुरु असलेला वाद मिटविण्यासाठी डीवायएसपी सचिन सांगळे यांना फोन करून उपजिल्हाधिकारी असल्याची बतावणी केली होती.

यावर डिवायएसपी सांगळे यांनी या तोतया उपजिल्हाधिकार्‍याला दि.20 रोजी दुपारी 5 वाजता भेटण्यासाठी बोलविले होते.

दरम्यान हा तोतया अधिकारी दुपारी 3.30 वाजताच सांगळे यांच्या कार्यालयात आला. त्याने महिला सहाय्यता कक्षात सुरु असलेला वाद मिटविण्याचे सांगून महिलेच्या पतीवर कारवाई करण्याचे सांगितले.

यावेळी डिवायएसपी सचिन सांगळे यांनी या अधिकारी म्हणून आलेल्या तोतयाशी विविध विषयांवर चर्चा करून कुठल्याही बॅचला उपजिल्हाधिकारी झाले असल्याची विचारणा केली.

यावेळी तोतया अधिकारी काहीसा गोंधळला होता. यामुळे डीवायएसपी सांगळे यांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांनी त्याला खाकीचा धाक दाखविला असता, तो पोपटासारखा बोलू लागला होता.

यावेळी डिवायएसपी सांगळे यांनी जिल्हापेठ पोलिस स्टेशनच्या अधिकार्‍यांना बोलावून त्याला त्यांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

अनेकांची केली फसवणुक – समाधान जगताप हा मुळ नाशिक जिल्हयातील बागलाण येथील रहिवाशी असून तो गेल्या तीन-चार वर्षापूर्वी नाशिक येथील हॉटेलवर मॅनेजर म्हणून काम करीत असतांना अपहार केल्याने मालकाने त्याला कामावरून काढून टाकले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्याने तहसिलदार व उपजिल्हाधिकारी असलेल्याचे सांगून अनेकांची फसवणुक केल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या माहिलेशी त्याचे प्रेमसंबंध असल्याचे त्यांने पोलिसांना सांगितले आहे. तसेच त्याने तहसिलदार असल्याचे सांगून नाशिक जिल्हयातील चौगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

मोटारसायकल चोरीचा गुन्हा – समाधान यांच्यावर नाशिक येथील भद्राकाली पोलिस स्टेशनमध्ये सन 2011-12 मध्ये मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी समाधानचा मोबाईल जप्त केला असून आंतरजिल्हा ग्रामसेवकांच्या बदल्या, वाईन शॉप परवाना मंजुरी बाबत संदेश पाठविल्याचे चॅटींगमध्ये दिसून आले आहे.

चारचाकी गाडी जप्त – डीवायएसपी व जिल्हापेठ पोलिसांच्या पथकाने समाधान जगताप यांची स्विफ्ट डिझायर कार जप्त केली असून ती कोणाच्या मालकीचे आहे. याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच समाधान जगताप व ज्योती वाडीले यांचा ओळख कशी झाली याचा देखील पोलिस शोध घेत आहे. त्याप्रमाणे डिवायएसपी व जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे पथक तपासासाठी नाशिक येथे रवाना झाले असल्याचे समजते.

पोलिस कोठडीत रवानगी – तोतया डिवायएसपी समाधान जगतापला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने समाधानला दि.24 पर्यंत पोलिस कोठडी तर ज्योती वाडीले या महिलेला न्यायालयीन कोठडी दिली आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. हेमंत मेंडकी यांनी कामकाज पाहिले.

शासनाच्या संकेतस्थळावरून मिळविले अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर
शासनाच्या संकेतस्थळावर समाधान जगताप याने अधिकार्‍यांचे मोबाईल नंबर मिळवून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे. फेसबुक, व्हाटस्अपवरून स्वताहुन सण, उत्सवाचे शुभेच्छा संदेश पाठवून ओळख निर्माण केली असल्याचे तपासात उघड झाले आहे. तसेच त्याने फेसबुक प्रोफाईलवर शासकीय लोगोचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे त्याने अनेक अधिकार्‍यांना फेन्ड रिकवेस्ट पाठविली असल्याचे दिसून आले आहे.

 

LEAVE A REPLY

*