रेशन दुकानदारांची संपातून माघार

0
जळगाव । दि. 20 । प्रतिनिधी-रेशन दुकानदारांच्या मागण्यांसाठी दि.1 ऑगस्टपासून पुकारलेल्या बेमुदत संपातून पुरवठा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती माघार घेण्यात आली आहे.
स्वस्त धान्य दुकानदार संपात सहभागी होणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटीया यांनी आज एका बैठकीत जाहीर केले.
जिल्ह्यातील रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

यावेळी सहाय्यक पुरवठा अधिकारी विलास हरीमकर उपस्थित होते. ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉपकिपर्स संघटनेने दि.1 ऑगस्टपासून बेमुदत संपाची हाक दिली होती.

मात्र दि.12 जुलै रोजी पुरवठा मंत्री ना.गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यानुसार संघटनेचे उपाध्यक्ष राजेश आंबुसकर यांनी संपात सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले.

जिल्हा पुरवठा बैठकीत देखील स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटीया यांनी संप न केल्याचे जाहीर केले. तसेच पॉस मशिनबाबत रेशनदुकानदारांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या.

बैठकीत जिल्हा दक्षता समितीवर सुनील तुळशीराम जावळे व महेंद्र बोरसे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

बैठकीला जिल्हाध्यक्ष तुकाराम निकम, भागवत पाटील, शहर दक्षता समिती सदस्य के.आर. बाम्हनदे, काशिनाथ पाटील, भिमराव महाजन, आर.डी. पाटील, मधुकर राजपुत, धनराज शिरसाठ, यशवंत बनसोडे, परमेश्वर वाघ, प्रशांत भालशंकर, पंडित पाटील, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*