जिल्ह्यात धरणांची परिस्थिती समाधानकारक

0

जळगाव / जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत आहे. असे असले तरी यावर्षी जिल्ह्यातील धरणांची परीस्थीती मात्र समाधानकारक असल्याची माहिती आकडेवारीवरून समोर आली आहे.

जिल्ह्याला सध्या मे हीटचा तडाखा चांगलाच बसत आहे. गत वर्षी मे महिन्यात 61 टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात आला होता.

यंदा मात्र टँकरची संख्या अत्यंत मर्यादीत राहीली आहे. जिल्ह्यात गतवर्षात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांमुळे आणि चांगल्या पावसामुळे यावर्षी पाणी टंचाई फारशी जाणवत नाही.

दुष्काळाच्या झळा बसु नये म्हणुन काही नगरपालिकांनी पाणी कपातीचे धोरणही राबविले आहे.

17 गावांना 9 टँकरद्वारे पाणी
जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील डांगर बु., अंचलवाडी, पिंपळे बु., धानोरा खु., खेडी बु., खर्दे, वासरे, देवगाव-देवळी, शिरसाळे, सुंदरपट्टी, लोणपंचम, सबगव्हाण, भरवस, जळगाव तालुक्यातील देव्हारी, आणि पारोळा तालुक्यातील वाघरा-वाघारी, मोहाडी, दहीगाव, खेडी ढोक या गावांना 9 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली. जिल्हा प्रशासनाने यंदा 7 कोटी 90 लाख रूपयांचा टंचाई आराखडा मंजुर केला आहे.

जलयुक्तच्या कामांचा लाभ
मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर झाल्याचा दावा यंत्रणांनी केला आहे. या कामांमुळेच टंचाईची समस्या फारशी गंभीर नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यावर्षीही जिल्ह्यातील गावे जलयुक्त करण्यासाठी कृषी विभागाकडुन जोरदार प्रयत्न केले जात आहे.

धरणांची परीस्थीती समाधानकारक
उन्हाचा पारा वाढता असला तरी धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा आहे. वाघुर धरणात 71.73, गिरणा- 25.52 आणि हतनुर धरणात 26.12 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.
प्रकल्प
पाणीसाठ्याची टक्केवारी

वाघुर
71.73

हतनुर
26.12

गिरणा
25.52

अभोरा
54.14

मंगरूळ
47.22

तोंडापुर
24.74

मोर
39.03

सुकी
46.34

गुळ
22.45

बहुळा
5.60

अग्नावती
00

भोकरबारी
00

हिवरा
00

मन्याड
00

बोरी
00

LEAVE A REPLY

*