Type to search

maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या : उद्या मतदान

Share
नवीदिल्ली । वृत्तसंस्था :  लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतील पहिल्या टप्प्यातील प्रचारतोफा मंगळवारी थंडावल्या.दि.11 रोजी देशभरात लोकसभेच्या 91 जागांसाठी मतदान होणार आहे. यात विदर्भातील सात जागांचा समावेश असून निवडणूक आयोगाची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होत आहे.

महाराष्ट्रात विदर्भातील सात मतदारसंघासह आंध— प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, मिझोराम, नागालँड, ओदिशा, सिक्कीम, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, निकोबारमध्ये मतदान पार पडेल.

तर गुरुवार 23 मे रोजी निवडणुकांचे निकाल हाती येतील.

पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ- वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे.

नागपूरमध्ये नितीन गडकरींविरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले रिंगणात उतरले असून 2014 च्या निवडणुकीत नाना पटोले यांनी गोंदियामधून भाजपाकडून निवडणूक लढवित राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. मात्र त्यांचे भाजपाशी न पटल्याने त्यांनी राजीनामा देवून त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!