Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांना युनिव्हर्सिटी ऑफ एशियाची मानद डी.लिट. प्रदान

Share
जळगाव :   कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र प्रशाळेचे संचालक व विचारधारा प्रशाळेचे प्रभारी संचालक प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांना यूसिव्र्हसिटी ऑफ एशिया या आंतरखंडीय विद्यापीठाची मानद डी.लिट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे.
 या मानद पदवीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाचा सन्मान झाला आहे. प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांच्या एकूण कार्याची व संशोधनाची दखल घेत यूसिव्र्हसिटी ऑफ एशियाच्या एशिया रिसर्च सेंटर, काठमांडू (नेपाळ) येथे आयोजित समारंभात ही डी.लिट मानद पदवी प्रा.डॉ.मंदीप मोहन्तो यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या यशाबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे मा.कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर व कुलसचिव भ.भा.पाटील यांनी प्रा.डॉ.अनिल डोंगरे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!