चौघांकडून देशी दारु, हॉटेलमध्ये लुटमार

0

जळगाव / तालुक्यातील म्हसावद जवळील एका देशी दारुचे दुकान हॉटेलवर चार तरुणांनी धिंगाणा घातला. हॉटेल व दुकानातील साहित्याची तोडफोड करीत सुमारे 50 हजाराची रोकड चौघांनी लांबविली.

तालुक्यातील म्हसावद जवळ शेखर भागवत सोनवणे यांच्या मालकीचे देशी दारु दुकान आहे.

त्याला लागून किशोर चौधरी यांच्या मालकीचे हॉटेल निलम आहे. देशी दारुच्या दुकानामध्ये किरण शांताराम साळूंखे (वय 27) हे काम करीतात.

किरण साळूंखे यांच्याकडे म्हसावदमधील विजय आमले याच्यासह तीन तरुणांनी येवून वाद घातला. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले.

यावेळी विजय आमले, गणेश आमले, बबलु, आबा घुले या चौघांनी देशी दारुच्या दुकानातील खुर्च्यांची तोडफोड केली. तसेच किरण साळुंखे यांना शिवीगाळ करीत चापटा बुक्यांनी मारहाण करुन जिवेठार मारण्याची धमकी देत गल्ल्यातील सुमारे 25 हजाराची रोकड आमलेसह चौघांनी लांबविली.

याप्रकरणी चौघांविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*