Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव मुख्य बातम्या

आज मेगाब्लॉक : शिवाजी नगरचा रेल्वे उड्डाणपुल तोडकामासाठी यंत्रणा सज्ज

Share
जळगाव । प्रतिनिधी   :  गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असून या कामामुळे जळगाव महापालिका व रेल्वे प्रशासनास रहिवाशांना रोषाला सामोरे जावे लागले होते. परिणामी रहिवाशांनी आंदोलनाच्या माध्यमातूनही उड्डाणपुलासंदर्भात प्रश्नचिन्हे निर्माण केले होते. परंतू आता काही दिवसांपुर्वी गर्डर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तीन महाकाय क्रेन यासाठी दाखल झाल्या असून मंगळवार दि. 9 रोजी सकाळी 10 ते 2 वाजे दरम्यान चार ते पाच तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येऊन जुने गडर्स काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या सुत्रांनी दिली.

जळगाव शहर व शिवाजी नगर या भागाला जोडणारा जळगांव जिल्हा परीषदेजवळ असलेला मध्य रेल्वेच्या जळगांव जंक्शन स्थानकानजीकच ब्रिटीश कालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुल आहे. यापुलाची कालमर्यादा सन 2013 मधे संपुष्टात आली असून तो उड्डाणपूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे मुंबई मध्य रेल्वे विभाग अधिकार्‍यांनी महानगर पालिका प्रशासनास कळविले होते.

परंतू महापालिकेच्या प्रशासनाने आर्थीक बाजुचे कारण पुढे करत या पुलाचे भीजत घोंगडे ठेवलेले होते. मध्यंतरीच्या काळात तात्पुरती व्यवस्था करुन पुलावरुन अवडत वाहनांची ये-जा बंद केली. टोलवा-टोलवीच्या प्रकारानंतर आता पुलाच्या कामाने गती घेतल्याचे चित्र आहे.

मंजूरीची प्रक्रिया लांबली, काम मात्र तात्काळ झाले सुरु

जळगाव शहर महानगरपालिकेने आर्थीक स्थितीचे कारण पुढे करत असल्याने उड्डाणपुल निर्मीतीचे कार्य बर्‍याचा वर्षांपासून लांबणीवर पडत होते. रेल्वे विभाग, जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठकीअंती हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात येवून जळगांव उपविभागीय अभियंता राउत यांनी त्या कामाचे सर्वेक्षण करून प्रशासकिय मान्यता मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निविदा काढण्यात आल्या.

स्ट्रक्चरल ऑडीट झाल्याने जुन्या पादचारी पुलाचेही लवकरच होईल काम

रेल्वे स्थानकावरील जुन्या पादचारी पुलाचे देखिल स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर तो पुल वाहतुकीस असुरक्षीत असल्यामुळे तो देखिल यापुर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुला सोबतच रेल्वे स्थानकावरील नव्या पादचारी पुलासाठी गडर्स देखिल बसविण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वे विभागाचे विशेष अभियंते व कन्स्ट्रक्शन कंपनीचे तज्ज्ञ हे कामगारांना मार्गदर्शन करीत आहेत.

जळगांव शहरातुन जाणार्‍या जुन्या महामार्गावरील असलेल्या शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाचे नुतनीकरणाचे कार्य हाती घेण्यापुर्वी महानगरपालिका प्रशासनाने शिवाजीनगर भागातुन शहरात येणार्‍या नागरीकांसाठी कोणतीही पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने सुरत रेल्वे गेट एसएमआयटी कॉलेज परीसर, बजरंग पुल, पिंप्राळा रेल्वे गेट व ग्रामीण भागातुन येणार्‍या बसेस गुजराल पेट्रोल पंपंमार्गे महामार्गावरून शहरात येत असत.

त्यात सुमारे 10 ते 12 किमी चा फेरा घेऊन नागरीकांना शहरात यावे लागत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण होउन नागरीकांना वेळेच्या अपव्ययास अद्यापही तोंड दयावे लागत आहे.

त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!