Type to search

maharashtra आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

राज्याच्या राजधानीत ‘जल‘संकट

Share
मुंबई : राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या सातही धरणात आता केवळ 25 टक्केच पाणी साठा शिल्लक असल्याने मुंबईकरांना ‘जल’ संकटाचा सामना करावा लागणार आहे.

गेल्या दोन वर्षांच्या आकडेवारीचा विचार केला तर, एप्रिल महिन्यातील हा निचांक आहे. मुंबईला भातसा, तुलसी, विहार, मध्य वैतरणा, मोडकसागर, तानसा आणि अप्पर वैतरणा या सात धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही धरणांच्या पाणी पातळीत घट झाली आहे. फक्त २५ टक्के  पाणी साठा  आहे. या सातही धरणांमध्ये आजघडीला ३.७४ लाख मिलियन लिटर पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ५.५९ लाख मिलियन लिटर पाणीसाठा शिल्लक होता. अप्पर वैतरणा आणि विहार धरणात २० टक्के, तर तुलसी धरणात ४२ टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात २६ टक्के साठा आहे.

धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला असला तरी, या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार नाही, असा विश्वास महापालिका अधिकारी व्यक्त करत आहेत.

या सर्व परिस्थितीवर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत, असंही ते सांगतात. संभाव्य पाणीटंचाईसंदर्भात महापालिकेतील संबंधित विभागाचे अधिकारी निश्चिंत असले तरी, भविष्यात मुंबईकरांच्या तोंडचे पाणी पळणार आहे, हे मात्र नक्की!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!