बळीराम पेठेतील हॉकर्सचे आज स्थलांतरण

0
जळगाव । दि.19 । प्रतिनिधी-जिल्हाधिकार्‍यांनी एकाच दिवसात गोलाणी मार्केट चकाचक केल्यानंतर आजपासून शहरातील उद्यानांच्या साफसफाईला देखील सुरुवात करण्यात आली आहे.
दरम्यान जिल्हाधिकार्‍यांनी बळीराम पेठ, शिवाजी नगर या भागात जावून पाहणी केली असून उद्या दि. 20 रोजी पासून हॉकर्सचे स्थालांतरण ख्वाजामिया चौकात करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त आयुक्त कीशोर राजे निंबाळकर यांनी आज शहरात बळीराम पेठ व शिवाजीनगर यासह विविध भागातील स्वच्छतेची पाहणी केली.

यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, आरोग्य अधिक्षक, आरोग्य निरिक्षक उपस्थित होते. त्यांनी शिवाजी नगरात थांबून नागरिकांकडून देखिल स्वच्छतेच्या कामांची माहीती जाणून घेतली. त्यानंतर नविन बस्थानकासमोरील भजे गल्लीत देखिल त्यांनी स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला.

उद्यानांच्या साफसफाईला सुरुवात
प्रभारी आयुक्तांच्या सूचनेवरुन शहरातील उद्यानांची देखिल स्चछता करण्याचे कामाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी मध्यवर्ती भागातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यांनाच्या साफ सफाई करण्यात आली.

महापौरांच्या वार्डात स्वच्छता मोहीम
गोलाणी मार्केटसह सतरा मजली इमारत असलेल्या मध्यवर्ती परिसरात स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर महापौर नितिन लढ्ढा यांचा प्रभाग 8 मध्ये आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी प्रभागातील तुंबलेल्या गटारी काढून त्याठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*