जयप्रभा स्टुडीओला ऐतिहासीक वारसा स्थळाचा दर्जा पूर्णत्वाने मिळण्याचा मार्ग मोकळा

0
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी राज्य सरकारविरोधात कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडीओबाबत दाखल केलेली याचीका मागे घेतली आहे.

चित्रमहर्षी भालजी पेंढाकर यांचा हा जयप्रभा स्टुडीओ राज्य सरकारने ऐतिहासीक वारसा स्थळ म्हणून घोषीत केले होते. त्यास रद्द करण्याची मागणी लता दिदींनी एका याचीकेव्दारे केली होती.

ती न्यायालयाने रद्दबातल ठरविली होती. या विरोधात त्यांनी सर्व्वोच्च न्यायालयात अपील केले होते. परंतू सदर अपील आता मागे घेत आहेत.

त्यामुळे जयप्रभा स्टुडीओला ऐतिहासीक वारसा स्थळाचा दर्जा पूर्णत्वाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

*