7 कोटी रुपयांच्या निधीतून 230 गटारींच्या कामांचा प्रस्ताव

0

जळगाव / मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेल्या 25 कोटी रुपयांच्या निधीतून गटारींसाठी 7 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार शहरातील 37 प्रभागांसाठी 230 गटारींच्या कामांचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे.

महानगरपालिकेचे आर्थिकस्थिती बिकट असल्यामुळे विकास कामांकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 कोटीचा निधी जाहीर केल्यानंतर मंजूरीचे पत्र प्रशासनाला प्राप्त झाले.

प्राप्त झालेल्या 25 कोटीच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली.

ना.पाटील हे दि.21 मार्च रोजी जिल्हा दौर्‍यावर आले असता 25 कोटी रुपयाच्या निधीतून विकासकामे करण्यासाठी निधीचे विभाजन करण्यात आले.

त्यानुसार एलएडी पथदिव्यांसाठी 10 कोटी, गटारींसाठी 7 कोटी, भूमिगत केबल टाकण्यासाठी 3 कोटी आणि नाल्याच्या काठावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी 4 कोटी असे एकूण 25 कोटीच्या निधीचे विभाजन करण्यात आले.

त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून 37 प्रभागांमध्ये 230 गटारी बांधण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*