भुसावळ शहरातील अस्वच्छता प्रश्न मार्गी लावा

0
जळगाव । दि.18 । प्रतिनिधी-भुसावळ शहरातील नालेसफाई, अस्वच्छता, अतिक्रमण, रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यात यावा या मागणीसाठी भुसावळ येथील जनआधार विकास पार्टीच्या नगरसेविका संगीता देशमुख यांच्यावतीने जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
भुसावळ शहर हे देशाच्या अस्वच्छतेच्या बाबतीत दुसर्‍या क्रमांकांवर तर राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. तरी देखील नगर पलिकेच्यावतीने कुठलीही दक्षता घेण्यात आलेली नाही. जुलै महिना संपत असला असून अद्याप शहरातील नालेसफाई झालेली नाही.

नालेसफाईसाठी कंत्राटदारांने रितसर निवीदा भरली असून सत्ताधारी निविदेला वर्क ऑर्डर देत नसून नालेसफाई न झाल्यास नालेकाठच्या रहिवाशांच्या जीवतास धोका निर्माण होवू शकतो.

त्याचप्रमाणे शहरातील मामाजी टॉकीज रोड, वरणगाव रोड, बसस्थानक परिसर, आरपीडी रोड या भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.

सत्ताधार्‍यांकडून भुसावळकरांच्या जीवनाशी खेळ सुरु आहे. त्यामुळे भुसावळ शहरवासिय मुलभूत सोईसुविधांपासून वंचित आहे.

जिल्हाधिकारी यांनी एक दिवस भुसावळ शहरासाठी द्यावा व शहरातील वस्तुस्थितीचा आढावा घेवून मुख्याधिकारी व सत्ताधार्‍यांवर कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन नगरसेविका संगिती देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*