जिल्हा न्यायालयाची 93 हजारांची रोकड स्टेट बँकेतून लंपास

0
जळगाव । दि.18 । प्रतिनिधी-दिवाणी न्यायालयातील कर्मचारी नेहमीप्रमाणे न्यायालयाचा भरणा करण्यासाठी स्टेट बँकेत आले होते. यावेळी भरणा करणार्‍या काऊंटरवर पैसे पडल्याचे सांगून कॅश काऊंटरवरील 93 हजारांची रोकड दोन अज्ञात चोरटयांनी लांबवून नेल्याची घटना सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान दोन चोरटे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून याबाबत जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जिल्हा व सत्र न्यायालया मधील चलनाची रक्कम भरणा करण्यासाठी न्यायालयाचे वरीष्ठ स्तर बेलीफ रामचंद्र सिताराम घोडके व शरद सुकदेव पाचपोळ सकाळी नेहमी प्रमाणे चलनाची रक्कम भरणा करण्यासाठी स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत निघाले. 11.30 वाजेला स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत पोहचले.

 

यावेळी चलन क्रमांक 169 रक्कम 3762,चलन क्रमांक170- 5000, चलन क्रमांक 171 -3000,चलन क्रमांक रक्कम 20 हजार 900, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय जळगाव कडील चलन क्रमांक 284 रक्कम 20 हजार 700, चलन क्रमांक 285 रक्कम 2000, चलन क्रमांक 286 रक्कम 6 हजार 850, चलन क्रमांक 287 रक्कम 3 हजार 218 रूपये असे एकुण 32 हजार 768 रूपये,न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी दुसरे न्यायालय जळगाव याचे चलन क्रमांक 67 रक्कम 900, अशी एकत्रीत रक्कम 93 हजार 330 रूपये घेवून भरणा करण्यासाठी बँकेत गेले होते. रक्कम ही जिल्हा व सत्र न्यायालयाची रक्कम काळ्या रंगाच्या बॅगेत 10 व 20 रूपयाची नाणे ठेवले होते. 93 हजार 130 रूपये हे नोटांचे बंडल करून न्यायालयाने दिलेल्या चलनामध्ये ठेवले होते.

जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल
पाचपोळ व घोडके यांनी घटनेची माहिती बँकेच्या मॅनेजर यांना दिली. मॅनेजर यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलिस स्टेशनला याबाबत कळविले. काहीवेळातच जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घोडके व पाचपोळ यांच्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात रामचंद्र सिताराम घोडके याच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
बॅकेत असलेल्या सीसीटिव्हीची तपासाणी केली असता त्यावेळेस दोन अज्ञात व्यक्ती त्याठिकाणी होते. हे दोन्ही व्यक्ती सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी चोरटयांच्या शोधात आहे.

पैसे पडल्याचे सांगून रोकड लंपास
भरणा करण्यासाठी बँकेच्या भरणा काऊन्टर 7 वर रांगेत उभे राहिले.भरणा करण्यासाठी नंबर आल्यावर पैसे भरणा काऊन्टर ठेवले.त्यावेळी घोडके हे भरणा करण्यासाठी पैसे ठेवत असतांना त्याच्या शेजारी दोन व्यक्ती फिरत होते. त्यातील एका चोरटयाने तुमचे पैसे खाली पडले असे सांगितले. त्यामुळे वाकुन पाहिले असता पायाजवळ दहा रूपयांच्या चार नोटा पडलेल्या दिसल्या घोडगे यांना वाटले की भरण्यातील पैसे पडले.त्या नोटा उचण्यासाठी वाकले असता डाव्या बाजुला उभा असलेल्या व्यक्ती गुंडाळलेली सरकारी रक्कम घेवून पसार झाले. यावेळी घोडके व पाचपोळ यांनी आरडाओरड करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु चोरटे पळून जाण्यास यशस्वी झाले होते.

 

LEAVE A REPLY

*