Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या राजकीय

गरिबीवर वार, ७२ हजार : राहुल गांधी

Share
नवी दिल्ली  :   सत्य आणि न्यायाची घोषणा करत रोजगार, शेतकरी, नोकदार आणि महिलांना न्याय मिळवून देणारा काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.

राहुल गांधी यांच्याह यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यावेळी उपस्थित होते.
 सध्या देशात सातत्याने खोटं बोललं जातेय, पण काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील कोणतीही खोटी घोषणा करण्यात आलेली नाही असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदी यांनी लोकांना १५ लाख रूपये देणार असे म्हटले होते. मात्र मोदी सरकारने जनतेला खोटी आश्वसने दिली आहेत. आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी आश्वासने दिली नाही. गरिबीवर वार, ७२ हजार असे म्हणत पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी भाजपावर निशाना साधला आहे.

मोदींची आरोग्य योजना म्हणजे जनतेकडून पैसा घेऊन उद्योगपतींना देण्यासारखं आहे अशी टीका राहुल यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, जनतेच्या खात्यात सरकार किती रक्कम टाकू शकतो? य़ाची मी माहिती घेतली. मोदींनी दोन कोटी रोजगाराचं खोटं आश्वासन दिलं.

मी माझ्या समितीला विचारलं सत्य काय आहे? आम्ही कोणतीही खोटं आश्वासने दिली नाही.  काँग्रेसच्या जाहीरनाम्यात जनतेच्या ‘मन की बात’ असे म्हणत राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर सरळ निशाना साधला. बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या हे मुद्दे देशातील वास्तव आहेत. तसेच भ्रष्टाचार, राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांवर नरेंद्र मोदींनी थेट माझ्यांशी चर्चा करुन दाखवावी असे आव्हानही यावेळी त्यांनी केले.

काँग्रेसचा ‘जन आवाज’ जाहीरनामा मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आला.  ‘हम निभाएंगे’ असं जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर आश्वासन देण्यात आले आहे.  काँग्रेस पक्षाने मंगळवारी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद आयोजित करत जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी मंचावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंह, पी. चिदंबरम आणि सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.

असा आहे जाहिरनामा

काँग्रेस सत्तेत आल्यास मनरेगा योजनेअंतर्गत 100 ऐवजी 150 दिवसांचा रोजगार देणार
पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या कक्षेत आणणार
शिक्षणावर जीडीपीच्या 6 टक्के खर्च करणार
मार्च 2020 पर्यंत 22 हजार पदे भरली जाणार
गरिबीवर वार, 72 हजार, या नुसार एका वर्षा ७२ हजार, तर ५ वर्षांमध्ये एकूण ३.६० लाख रुपये गरिबांच्या खात्यात जमा करणार
काँग्रेस पार्टी मार्च 2020 पर्यंत देशातील सरकारी खात्यात 22 लाख नोकऱ्या देणार
10 लाख युवांना ग्रामपंचायतीत नोकऱ्या देणार
काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करणार
गरिबांसाठी किमान उत्पन्न देण्याची काँग्रेसची हमी, गरिबांचं किमान उत्पन्न 72 हजार करु
तरुणांना उद्योगांसाठी 3 वर्षांसाठी कोणाचीही परवानगी घ्यावी लागणार नाही. बँकांचे दरवाजे खुले असतील.
शेतकऱ्यांनी कर्ज फेडलं नाही, तर फौजदारी गुन्हा दाखल होणार नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!