नेरी शाळेला गळती : ग्रामस्थांनी ठोकले कुलूप

0

पाचोरा, |  प्रतिनिधी :  तालुक्यातील नेरी येथील माध्यमिक विद्यालयाची गळतीमुळे अतिशय दैनावस्था झाल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.

नगरदेवळा येथून जवळ असलेल्या नेरी येथे राजमाता जिजाऊ भोसले माध्यमिक शिक्षण संस्था आहे. या विद्यालयात परिसरातील शेकडो गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेतात. एकीकडे शासन डिजिटल इंडिया डिजिटल शाळांकडे वाटचाल करीत असताना नेरी येथील शाळेची भग्नावस्था आहे.

गेल्या २ दिवसांपासून वरूणराजाचे पुनरागमन झाल्याने शाळेला अक्षरशः गळती लागली आहे. अश्या गळतीमध्ये शिक्षक छत्री घेऊन शिकवीत होते व विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे चित्र बघावयास मिळाले. त्यावेळी संतप्त झालेल्या पालक व ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.

याबाबत ३ ते ४ महिन्यांपासून वारंवार शिक्षणाधिकारी जितेंद्र महाजन व संस्था चालक श्याम शिंपी यांना लेखी व तोंडी तक्रारी करून देखील प्रशासन व संस्थाचालक जागे झाले नाहीत, अखेरीस ग्रामस्थांनी शाळेला कुलुप ठोकले.

LEAVE A REPLY

*