केळी व्यापार्‍यांची फसवणुक प्रकरणी पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा

0
सावदा, ता. रावेर, | वार्ताहर :  येथे गेल्या आठवड्यात सावदा पोलीस स्टेशनसमोर सानिया काद्री यांनी सावदा येथील खंडेलवाल पिता-पुत्रा विरुद्ध सुमारे २ कोटी रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा म्हणून केलेले उपोषण सुटले होते, मात्र गुन्हा दाखल झालेला नव्हता. दि. १६ रोजी रात्री उशिरा अखेर नायगाव येथील केळी एजंटाचे ङ्गिर्यादीवरून सावदा पो.स्टे.ला. खंडेलवाल पिता-पुत्रा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नायगाव (ता.मुक्ताईनगर) येथील जय बजरंग केला एजन्सीचे संचालक अनिल सुधाकर महाजन यांनी दि. ६, ७ व ८ मे २०१७ तसेच दि. ८ जून २०१७ या दिवशी ऐनपुर येथील कैलास रघुनाथ पाटील व वासुदादा उर्ङ्ग रविंद्र सीताराम महाजन तसेच दोधा येथील प्रवीण पाटील यांचा ८ लाख ६३ हजार ८३० रुपये किंमतीचा केळी माल घेतलाU

सावदा येथील खंडेलवाल ट्रान्सपोर्टवर त्यांचे संचालक कैलास दुलीचंद खंडेलवाल, मयूर कैलास खंडेलवाल, तसेच अनिस उर्ङ्ग अनि यांना दिला. माल देतेवेळी सदर नवतीत असल्याने त्या नवतीचा बाजार भावाप्रमाणे भाव देण्याचे ठरले.
मात्र यानंतर ङ्गिर्यादी हे पैसे मागण्यास गेले असता खंडेलवाल यांनी पिलबागाचे भावाप्रमाणे पैसे देऊ केले.

मात्र ङ्गिर्यादी व साक्षीदार यांनी मात्र याच भावाप्रमाणे पैसे मिळतील, असे सांगत पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे मागितले असता कमी पैसे पाहिजे असल्यास घ्या अन्यथा जेथे जावयाचे तेथे जा, असे सांगत पुन्हा येथे आल्यास हात पाय तोडून टाकू, अशी धमकी दिली व ८,६३,८३० रुपयांची फसवणुक व विश्वासघात केला.

म्हणून कैलास खंडेलवाल, मयूर खंडेलवाल, अनिस उर्ङ्ग अनि यांचेविरुद्ध भाग ५, गुरनं. ३५/१७, भादंवि ४०६, ४२०, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे सावदा पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास ए.पी.आय राहुल वाघ हे करीत आहेत. दरम्यान पिता-पुत्र हे पोलीसांना अद्याप मिळून आलेले नाहीत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

LEAVE A REPLY

*