Type to search

Breaking News maharashtra आरोग्यदूत आरोग्यम धनसंपदा आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

सावधान! राज्यात उष्णतेची लाट

Share
पुणे । प्रतिनिधी :  आगामी 5 दिवसांमध्ये राज्यात कोकण विभाग सोडून सर्वत्र उष्णतेची लाट येणार असल्याचा इशारा हवामान खात्याने आज दिला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्रासाठी पुढच्या 3 दिवसात, मराठवाडयात पुढच्या 4 दिवसात आणि विदर्भात पुढच्या पाच दिवसात उष्णतेची लाट येणार आहे. यात उत्तर महाराष्ट्रात राज्यातील सर्वाधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली असल्याने प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अमुलाग्र बदल झाला आहे. दोनच दिवसांपुर्वी हवामान खात्याने राज्यातील काही भागात अतिवृष्टी होणार असल्याचे सांगितले होते. काही ठिकाणी अतिवृष्टी झाली देखील होती. सध्या तापमानाचा पारा 40 अंशांच्या वर गेला आहे तर अनेक ठिकाणी तापमान 37 पेक्षा अधिक आहे. उष्णतेची लाट येणार असल्याने उष्माघाताच्या त्रासापासुन वाचण्यासाठी आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

राज्यात भुसावळ,नागपूरसह विदर्भात अधिक तापमानाची नोंद यापुर्वी झाली आहे. चंद्रपूरमध्ये 41, नागपूरमध्ये 40 आणि सोलापुर आणि औरंगाबादमध्ये 39 तर सोलापूर जिल्हयातील अक्क्लकोट येथे 38 आणि उस्मानाबाद जिल्हयातील बार्शी येथे 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्याच्या तापमानात देखील वाढ झाली आहे. नागरिकांनी उष्णतेची लाट येणार असल्याने खबरदारी घ्यावे असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

तापमानाचा पारा 40 ते 42 अंशांवर पोहोचला आहे. पुढील काही दिवस कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती राहणार असल्याने तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!