शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणार्‍या संस्थांवर कारवाई – जिल्हाधिकारी

0
जळगाव । दि.17 । प्रतिनिधी-शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची अडवणूक करणार्‍या संस्थांवर कारवाई करण्याचा ईशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीच्या बैठकीत दिला.
जिल्हा सामाजिक विकास शक्ती प्रदत्त समितीची बैठक जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.

या बैठकीस जिल्हा समाज कल्याण अधिकारी पाटील, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी राठोड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रमेश काटकर, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक अनिसा तडवी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणेसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. या योजनांचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ घेता यावा यासाठी जिल्हयात आधारकार्डची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज दिल्या.

तसेच शिष्यवृत्तीस पात्र असणार्‍या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तातडीने काढून घेऊन त्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

 

LEAVE A REPLY

*