सारवे येथे ट्रकच्या धड़कने आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
‌पारोळा(श प्र) : नॅशनल हायवे सहा वरील सारवे येथे आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अज्ञात ट्रकचालकाने मोटरसायकलस्वारला जबर धड़क दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

गजमल नगर ता एरंडोल येथील राहिवाशी कैलास चूड़ामन पवार वय 47 हे नेहमीप्रमाने आपल्या ताब्यातील मोटरसायकल एम् एच 19 सी एस 4494  वरुण निघाले.  ते सावखेड़ा होळ उपआरोग्य केंद्रात आरोग्य सेवक म्हणून कार्यरत आहेत. हे उपकेंद्र मंगरुळ ता पारोळा येथिल ते आरोग्य केंद्राच्या अंतर्गत आहे म्हणून ते मंगरुळ येथे गोळ्या, औषधी घेण्यासाठी जात असताना सारवे गावनजीकाच्या गतिरोधका  जवळ कोणीतरी अज्ञात ट्रकचालकाने त्यांच्या मोटरसायकलला  जबर धड़क दिल्याने ते गभीर जखमी झाले.

त्यांना 108 च्या रुग्णवाहिकेने तत्काल पारोळा येथे कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांच्या रस्त्याच मृत्यू झाला. त्यांच्या पश्यात पत्नी दोन मुले एक मुलगी आहे या बाबत शरद रमेश पवार यांनी फिर्याद दिल्यावरुंन पारोळा पारोळा पालिसात अज्ञात ट्रकचालकाच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

LEAVE A REPLY

*