व्हिसासाठीच्या नवसाला पावणारे गणपतीबाप्पा!

0
चेन्नई| वृत्तसंस्था :  देव आणि भक्ताचे नाते जिव्हाळ्याचेच असते. भक्तमंडळीही देवाकडे काय मागतील आणि देवाला कोणते नाव ठेवतील हे काही सांगता येत नाही.

आपल्याकडे लाडक्या भक्तांनी देवाला बरीच लडिवाळ नावे दिलेली आढळतात. त्यामध्ये गणपतीबाप्पाची नावे तर बर्याच ठिकाणी अशीच वेगळी आहेत! तामिळनाडूतही असाच ‘पुळ्ळैयार’ म्हणजे ‘व्हिसा गणपती’ आहे. हा गणपती व्हिसा मिळावा म्हणून केलेल्या नवसाला पावतो, अशी ख्याती आहे!

या मंदिरात परदेशात जाऊ इच्छिणार्यांच्या व्हिसाच्या प्रार्थना पूर्ण होतात, असा भक्तांचा अनुभव आहे. पळवतंगळ येथे हे मंदिर असून ते २९ वर्षे जुने आहे.

मात्र, गेल्या नऊ वर्षांपासूनच येथे व्हिसाच्या इच्छुकांना गणपती बाप्पा पावत आहेत. त्यामुळे संपूर्ण तामिळनाडूतून भक्त येथे येत आहेत. विशेष म्हणजे चेन्नईच्या दूतावासापासून हे मंदिर ङ्गक्त १०किलोमीटरवर आहे.

येथे भक्त ङ्गूल, नारळ, उदबत्ती, केळे अशा पूजेच्या सामानासोबत हातात पासपोर्ट घेऊन उभे राहतात.‘हे लोक व्हिसा मिळविण्यासाठी येथे येतात,’ असे हे मंदिर बांधणार्या आर. जगन्नाथन यांनी सांगितले. हे मंदिर १९८८ साली बांधण्यात आले तेव्हा ते श्री लक्ष्मी गणपती मंदिर या नावाने प्रसिद्ध होते.

‘हळूहळू मंदिरात येणार्या व्हिसाच्या अर्जदारांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे नऊ वर्षांपूर्वी आम्ही त्याचे नामकरण पुळ्ळैयार व्हिसा गणपती असे नामकरण केले,’ असे जगन्नाथन म्हणाले.

पंजाबमध्येही व्हिसाबाबत प्रार्थना करण्यासाठी लोक एका मंदिरात जातात व तिथे विमानाची प्रतिकृती (खेळणे) अर्पण करतात!

LEAVE A REPLY

*