‘देशदूत’, रोटरी ईस्ट, क्रीडा कार्यालय, क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

0

जळगाव |  प्रतिनिधी :  सतरा वर्षाखालील फुटबॉलपटूंसाठी फीफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसह फुटबॉल क्रीडा प्रकाराचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दै.‘देशदूत’, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राईट फाऊंडेशन, विनोद इंजिनिअरींग, डायकन प्रायोजित सेल्फी पॉईंटचे जिल्हा क्रिडा संकुलात महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या हस्ते सेल्फी काढून शानदार उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनानंतर रोटरी क्लब ईस्टचा फुटबॉलचा सामना चांगलाच रंगला.

फीफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा दि.१० ते २४ ऑक्टोबर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच देशभरात फुटबॉलचा फिवर सुरु आहे. राज्यातही शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी दै.‘देशदूत’, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राईट फाऊंडेशन, विनोद इंजिनिअरींग, डायकन प्रायोजित जळगावात जिल्हा क्रीडा संकुल, मू.जे. महाविद्यालय, काव्यरत्नावली चौक आणि टॉवर चौकात सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात फुटबॉलला किक मारुन तसेच सेल्फी काढून सेल्फी पॉईंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चनसिंग, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, दै.देशदूतचे महाव्यवस्थापक विलास जैन, रोटरी ईस्टचे अध्यक्ष डॉ.गोविंद मंत्री, सचिव तथा दै.देशदूतचे व्यवस्थापक मनिष पात्रीकर, विदेशी पाहुणी आयेशा आदी मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनीही सेल्फी काढली. याप्रसंगी रोटेरियन संजय गांधी, अभय कांकरिया, राजेश जवाहरानी, महेंद्र अग्रवाल, रजनीश लाहोटी, शरद जोशी, डॉ.जयदिप छाबडा, डॉ.राहुल भनसाली, डॉ.मनिष चौधरी, डॉ.अमेय कोतकर, सिद्धार्थ जैन, सचिन बलदवा, धर्मेश गादीया, वल्लभ अग्रवाल, निलेश नाथाणी, नरेंद्र जैन, भावेश शहा, योगेश व्यास, सचिन जेठवाणी, विनोद पाटील यांच्यासह मंजुषा पात्रीकर, प्रा.डॉ.अनिता कोल्हे उपस्थित होते. सुत्रसंचलन जैन स्पोर्टस् ऍकडमीचे फारुख शेख यांनी केले.

फुटबॉलचा रंगला सामना

सेल्फी पॉईंटच्या उद्घाटनानंतर रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टतर्फे आयोजित फुटबॉलचा सामना चांगलाच रंगला. या सामन्यात रोटेरियन सहभागी झाले होते.

विदेशी पाहुणी आयेशाची उपस्थिती

दै.‘देशदूत’, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राईट फाऊंडेशन, विनोद इंजिनिअरींग, डायकन प्रायोजित सेल्फी पॉईंटचे शानदार उद्घाटन झाले. या उद्घाटनासाठी विदेशी पाहुणी आयेशाची विशेष उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

*