भुसावळसह परिसरात संततधार पाऊस : हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले

0
भुसावळ |  प्रतिनिधी :  हतनूर धरणाच्या लाभ क्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले असून १६० क्यू सेक पाणी तापी नदीत सोडण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दि. १५ व १६ जुलै रोजी जिल्ह्यासह हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात सुरु असलेल्या पावसाने धरणाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने दि. १६ रोजी धरणाचे ८ दरवाजे उघडण्यात आले असून यात ४ दरवाजे आर्धा मीटर तर ४ दरवाजे १ मीटर उघडण्यात आल्याने तापी नदी पात्रात १६० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

सद्या धरणात धरणात १५९ दलघमी इतका पाणी साठा आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही मात्र दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. ही मागल वर्षाच्या तुलनेत समाधानकारक नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.सद्या धरणात १० टक्के जलसाठा उपलब्ध आहे.

दरम्यान, रविवार दि. १६ जुलै रोजी दिवसभर पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातीलसखल भाग व रस्त्यांवर पाणी साल्याचे चित्र होते. बस स्थानक परिसर, जामनेर रोडवर आनंद नगर, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स सह शहरातील विविध भागात पाणी साचल्याचे चित्र होते.

रविवारी भुसावळचा बजार असल्यामुळे बाजारात गर्दी होती मात्र दुपारी सुरु झालेल्या पावसानने बाजारातील व्यपारी व नागरिकांची धावपड उडाली. दिवसर पावसाची रिपरिप सुच असल्याने दिवसभर कामांचा खोळंबा झाल्याचे चित्र होते.
दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शेतकरी वर्ग मात्र सुखावला आहे.

तालुक्यात बहुतांश शेतकर्‍यांची पेरणी आटोपली असून बराच काळात पाऊन न झाल्याने दुपार पेरणीचे आवट असतानना दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

LEAVE A REPLY

*