आयुर्वेद संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-ग्रामीण भागातील आदिवासी दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा देणार्‍या बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकार्‍यांना शासकीय सेवेत घ्यावे, या मागणीसाठी आज येथील महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना आयुर्वेद संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
हिवाळी अधिवेशनात आरोग्यमंत्र्यांनी सभागृहात तीन महिन्यांत अस्थायी बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकार्‍यांना सेवेत घेऊ, असे आश्वासन दिले होते.

मात्र, ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अधिकार्‍यांना कोणतेही शासकीय फायदे मिळत नाहीत. अस्थायी सेवा देताना किमान बारा वैद्यकीय अधिकार्‍यांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

त्यांच्या कुटुंबीयांनाही आतापर्यंत शासनाने मदत दिलेली नाही. 24 जुलैपासून सुरू होणार्‍या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात संघटनेतर्फे साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

अस्थायी बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकार्‍यांना स्थायी करावे, स्थायी बी. ए. एम. एस. वैद्यकीय अधिकारी गट बफ त्यांचे गट अफ वैद्यकीय अधिकारी म्हणून परिपत्रक निर्गमित करावे या मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संघटनेचे राज्य सल्लागार डॉ. बी. आर. पाटील, राज्य सचिव डॉ. अरुण कोळी, राज्य उपाध्यक्ष डॉ. हेमंत बर्‍हाटे, डॉ. राष्ट्रपाल अहिरे, जिल्हाध्यक्ष डॉ. सचिन ठाकूर, कार्याध्यक्ष डॉ. शरद पाटील, डॉ. शिवराय पाटील, डॉ. वाडेकर, डॉ. चंद्रेश खरे आदींनी आंदोलनात सहभाग घेतला.

 

LEAVE A REPLY

*