पिंप्राळा रेल्वेगेटजवळ संशयास्पदरित्या तरुणाचा मृतदेह

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-शहरातील पिंप्राळा रेल्वे गेट जवळील यश लॉन्ससमोर एका 26 वर्षीय तरुणाचा मृतहेद आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास आढळून आला.
दरम्यान या तरुणाच्या अंगावर जखमांच्या खुणा असल्याने या तरुणासोबत घातपात झाल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात आला असून तरुणाच्या खिश्यातील आधारकार्ड व ड्रायव्हींग लायसन्सवरुन या तरणाची ओळख पटली. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दीपक आनंद पाटील (वय 26 रा. रिधुर) असे मयत तरुणाचे नाव आहे. दीपक हा गणेश कॉलनीत राहणारे काका शरद महारु पाटील यांच्याकडे राहत होता. दरम्यान दीपक हे गेल्या वर्षभरापासून शहरातील एका खाजगी कंपनीत कंत्राट पद्धतीवर कामाला असून दि. 14 रोजी दुपारी 4 वाजता कंपनीतून घरी आला.

त्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घरच्यांना बाहेर फिरुन येतो असे सांगून घरातून आपल्या दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र रात्री उशीरापर्यंत दीपक घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याला रात्री 9 वाजेच्या सुमारास त्याला कॉल केला यावेळी त्याचा मोबाईल संपर्क कक्षेच्या बाहेर होता.

दरम्यान काही वेळानंतर कुटुंबीयांनी पुन्हा कॉल केला असता मोबाईल स्विच ऑफ येत असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. त्यानंतर आज सकाळी लोहमार्ग पोलिसांना पिंप्राळा रेल्वे गेट जवळ मृतदेह असल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दीपकचे वडील रिधुर येथे शेतीकाम करत असून आई गृहीणी आहे. त्याच्या पश्चात आई व दोन बहीणी असा परिवार आहे.

दीपकच्या अंगावर जखमांचे निशान
सकाळी साडेअकराच्या सुमारास रेल्वे रुळाच्या कडेला तरुणाचा मृतदेह आढळून आला. यावेळी मृतदेहाचा पंचनामा करीत त्याच्या डोक्यास मागच्या बाजूला मार लागला असून त्याचा उजवा हात व डावा पाय मोडला असल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच दीपकच्या पोटाच्या डाव्या बाजूला खोल छिद्र असल्याने त्याला काही तरी धारदार टोच्यासारख्या शस्त्राने भोसकले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. त्यामुळे दीपक सोबत काहीतरी घातपात झाल्याचा असल्याची शंका पोलिसांनी वर्तावण्यात येत आहे.

शेजारच्या अपार्टमेंट जवळ मिळाली दुचाकी
दीपक यांची दुचाकी यश लॉन्स जवळ असलेल्या एका अपार्टमेंट जवळून मिळून आली. तसेच या अपार्टमेंटमध्ये असलेले सिसिटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज पोलिसांनी तपासले असता. त्यांना रात्री सुमारे दोन वाजेच्या सुमारास आपर्टमेंट जवळ दुचाकी आल्याचे दिसून आली. त्यानंतर आज सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर दुचाकी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली.

आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सवरुन पटली ओळख
बाहेर फिरुन येतो असल्याचे सांगून घराबाहेर पडलेल्या दीपकचा मृतदेह आज सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास आढळला. यावेळी मृतदेहाचा पोलिसांनी पंचनामा केला असता. त्याच्या खिश्यातून आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व मोबाईल मिळून आला. तसेच शेजारच्या अपार्टमेंट मध्ये दीपकची मोटारसायकल मिळून आली. मात्र त्याची चावी गहाळ असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

नातेवाईकांचा आक्रोश
लोहमार्ग पोलिसांकडून दीपकचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेतली. यावेळी समोरच दीपक मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला होता.

 

LEAVE A REPLY

*