Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

‘महादेवभाई’ नाटकाचे जळगावात होणार सादरीकरण

Share

जळगाव (ता. 24) प्रतिनिधी : महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला 29 जानेवारीला संध्याकाळी 8 वाजता, भैय्यासाहेब गंधे नाट्यगृह, येथे ‘महादेवभाई’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. ‘बा-बापू150’ उपक्रमांतर्गत गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि जळगावमधील ओम थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या नाट्यप्रयोगातून महादेवभाई व महात्मा गांधी यांना जवळून बघण्याचा-समजून घेण्याचा योग जळगावकरांना आहे. यासाठी आयोजकांतर्फे सर्वांना प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे.

गांधी रिसर्च फाऊंडेशन ‘बा-बापू 150’ अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहे. त्याच्याभाग म्हणून रमेश भोळे दिग्दर्शीत‘महादेवभाई’ नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. गांधींजींसोबत स्वीय साहाय्यक म्हणून महादेवभाई संपूर्ण आयुष्यभर होते. महादेवभाई समक्ष गांधीजींबद्दल जे जे घडले ते ते सर्व त्यांनी त्यांच्या रोजनिशीमध्ये नोंदविले आहे. ज्या दिवशी बापूंसोबत ते नव्हते त्या दिवशाची पाने त्यांनी कोरी सोडली आहे. अशा 27 ते 28 डायऱ्या त्यांनी लिहल्या. या रोजनिशीच्या आधारे प्रसिद्ध लेखक रामू नामनाथन यांनी इंग्रजी भाषेत हे नाटक लिहिले. एकपात्री असलेल्या या प्रयोगाचे मराठी भाषेत माया पंडीत यांनी अनुवाद केला. जळगावातील नाटककार, लेखक, रमेश भोळे यांनी बहुपात्री नाट्यप्रयोगाची निर्मीती केली. यामध्ये महादेवभाईंचा गांधीजींना भेटण्याआधीचा, भेटल्यानंतरचा, शेवटच्या श्वासापर्यंत गांधी सोबतचा प्रवास उलगडला जाणार आहे. ‘महादेवभाई’नाटकामुळे गांधीजीसोबत केलेले कष्ट व बौध्दीक कामे, गांधीजींचा पत्रव्यवहार, समर्पित देशभक्तीची ओळख होणार आहे. गांधीजींच्या विविध सामाजिक, स्वातंत्र्याबद्दल, एकंदरीत माणूस जीवन जगण्याच्या पद्धतीचे दर्शन नाटकातून घडणार आहे.

सर्वांनसाठी प्रवेश खुला

गांधीविचारांना वाहिलेल्या, मानवीमूल्यांचा ठेवा अधोरिखित करणाऱ्या दोन अंकी ‘महादेवभाई’ प्रयोगाचे दिग्दर्शन रमेश भोळे यांनी केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या राज्य नाट्य स्पर्धेत हे नाटक सादर करण्यात आले होते. दीपक भट, मोरेश्वर सोनार, विजय जैन, नितीन देशमुख, श्रद्धा शुक्ल, हरीओम त्रिपाठी, हितेश नेरकर, पूनम गुंजाळ, सुभाष मराठे, श्रीराम वाघमारे, स्वप्ना लिंबेकर, गौरी जाधव, कल्याणी ईशी, सुरभी पाटील, वैभव मावळे, निलेश रायपुरकर, महेश गुंजाळ, मोहीत चौधरी, राहुल पवार, अभिषेक, अनिरूद्ध गुंजाळ, यज्ञेश करंके, श्रयेश शुक्ल, योगेश शुक्ल, आशिष कुलकर्णी, सचिन चौघुले, अरूणा मराठे, सोमनाथ सानप, निता भावसार यांच्या अभिनयातून हे नाटक साकारले आहे. मंगळवारी होणाऱ्या या प्रयोगासाठी सर्वांना खुला प्रवेश असणार असून नाट्यप्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!