व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेची हालचाल

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-महापालिकेच्या मुदत संपलेल्या28 व्यापारी संकुलांपैकी18 व्यापारी संकुलातील 2175 गाळे दोन महिन्यात ताब्यात घेण्याचे आदेश काल औरंगाबाद ख़डपीठाने दिले आहेत.
तसेच 15 दिवसात ही प्रक्रीया सुरु करण्याबाबत सूचना असल्याने मनपा प्रशासनाने पहिल्या टप्प्यात नोटीस देवून सुनावणी पूर्ण केलेले 655 गाळे ताब्यात घेण्याबाबतची हालचाल सुरु करण्यात आली आहे.
महापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या 18 व्यापारी संकुलातील 2175 गाळे ताब्यात घेण्याची प्रक्रिया 15 दिवसांत सुरू करून दोन महिन्यात पूर्ण करावी.

या प्रक्रियेत शासनाने हस्तक्षेप करू नये, असे आदेश दिले आहे. महापालिकेच्या 18 मार्केटमधील 2175 गाळ्यांची भाडेकराराची मुदत संपली आहे.

त्यानतंर महापालिकेने या गाळेधारकांना महापालिका अधिनियम 81 (ब) नुसार नोटीसा दिल्या होत्या. या नोटीसांवर 2175 पैकी केवळ सेन्ट्रल फुले व्यापारी संकुल311,रामलाल चौबे व्यापारी संकुल 40, भोईटे व्यापारी संकुल 24, जुने बी.जे.व्यापारी संकुल 216, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व्यापारी संकुल 64 असे एकुण 655 गाळेधारकांची सुनावणी पूर्ण करण्यात आली आहे.

त्यामुळे आता 15 दिवसात प्रकीया सुरु करायची झाल्यास 655 गाळे ताब्यात घेण्याची प्रकीया सुरु करण्याबाबत चाचपणी सुरु करण्यात आली आहे.

उर्वरित जे गाळे आहेत, त्या गाळेधारकांना नोटीस दिल्या आहेत. त्यांची सुनावणी घेवून त्यावर निकाल द्यावे लागतील. आणि त्यानतंर ते ताब्या घेण्याची कारवाई करता येणार असल्याची माहीती महापौर नितिन लढ्ढा यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

*