मुख्याध्यापक सरोदे यांचे निलंबन मागे घेण्यासाठी धरणे आंदोलन

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी-आर.आर. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांचे अन्यायकारक निलंबन मागे घेवून संस्थेवर त्वरित प्रशासक बसवावा, या मागण्यांसाठी शाळेतील 68 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. शिक्षकांच्यावतीने उपमुख्याध्यापिका व्ही.के. काबरा, एन.आर. कुमावत, पी.एस. वानखेडे, पी.एस. याज्ञिक, डी.आर. बसेर, एस.एम. भोसले यांच्या शिष्टमंडळाने जि.प. प्रशासनाला निवेदन दिले. आंदोलनास्थळी विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी एच.जी. इंगळे, एस.डी. भिरुड, जे.के. पाटील, सी.डी. पाटील, आर.एस. बाविस्कर, तुकाराम बोरोले, सी.सी. वाणी, आर.डी. चौधरी, सुहास चौधरी, आर.आर. पाटील, साधना लोखंडे, बी.डी. महाले, एस.एन. पाटील, डॉ.निकम, आर.सी. पाटील, प्रमोद गरुड, अजय देशमुख, नारायण वाघ, प्रभाकर पर्वे, रोहित गांगुर्डे, सुगचंद पाटील यांनी आंदोलनाला पाठींबा दिला.

LEAVE A REPLY

*