तांबापुरात जुगार अड्ड्यावर छापा

0
जळगाव । दि.15 । प्रतिनिधी -शहरातील तांबापुर भागातील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारला. यात त्यांना जुगार खेळत असलेल्या 5 जणांना त्यांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ताब्यात असलेल्यांना पुढील कारवाई साठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील तांबापुरातील हुडको या परिसरात जुगार खेळत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मिळाली.

त्यांनी मिळालेल्या माहितीवर पोनि. राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश इंगळे, पोहे कॉ. रविंद्र घुगे, दिलीप येवले, अशोक चौधरी, सतिश होळणार, विनोद पाटील, दिनेश बडगुजर, रामकृष्ण पाटील, रविंद्र चौधरी, दत्तात्रय बडगुजर यांनी आज दुपारी दीड वाजता ताबापुरातील जुगार खेळत असलेल्या अड्ड्यावर छापा मारला.

यावेळी जुगार खेळत असलेले अश्पाक शहा हारून शहा (रा.मेहरूण), याकुब नजिर पिंजारी (रा.पिरजादे वाडा), अस्लम खान सलिम खान (रा.मेहरूण), विठ्ठल आत्माराम लहेकर (रा.जोशीवाडा), इब्राहिम यासीन खाटीक (रा.मच्छीमार्केट) या पाच जणांना अटक केली. त्यानंतर त्यांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून रोख रक्कम, मोटारसायकल, मोबाईल व जुगाराचे साहित्य असे 2 लाख 10 हजार 350 रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त करण्यात आला. तसेच ताब्यात घेतलेल्यांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*