बालगंधर्व स्मृतीदिनाचा नाट्य कलावंतांना विसर

0
अमोल कासार,जळगाव । दि.15 ।-स्त्री अभिनयाची हुबेहुब छाप पाडणारे बालगंधर्व उर्फ नारायण श्रीपाद राजहंस यांचे निधन 1967 रोजी झाले होते.
दरम्यान आज त्यांच्या निधनाला पन्नास वर्षे पुर्ण झाले असुन त्यांच्या स्मृतीदिनाचा विसर शहरातील रंगकर्मी अन् नाट्यकलावंतानाही पडल्याचे दिसुन आले.

बालगंधर्व नाट्यकर्मींसाठी एक भव्य व्यासपीठच. नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व यांचा जन्म 26 जून सन 1888 साली सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागठाणे या गावात झाला.

बालगंधर्वांनी आपल्या कारकिर्दीत अनेक अभिनय साकारले. तसेच मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतील अभिनेते, गायक आणि नाट्यनिर्माते होते.

पुर्वीच्या काळात महिलांना नाट्यक्षेत्रात काम करणे अपवाद असल्याने त्यांना नाट्य क्षेत्रापासून लांब ठेवल जात असे. परंतू नाटयाच्या रंगभूमीवर बालगंधर्वंना स्त्रियांच्या हुबेहुब साकारलेल्या भूमीकेमुळे त्यांना या काळात मोठी लोकप्रियता मिळाली.

सन 1967 मध्ये बालगंधर्वांचे निधन झाले.नाट्यक्षेत्रात आज त्यांच्या स्मृतीदिनानिमीत्त विविध कार्यक्रमांतुन आदरांजली वाहण्यात आली.

मात्र शहरात स्वत:ला रंगकर्मी आणि नाट्यकलावंत म्हणून मिरवून घेणार्‍यांना बालगंधर्वंच्या स्मृतीदिनाचा जणू विसरच पडला. एरवी छुटपुट कार्यक्रम घेऊन चमकोगिरी करणारेही आज दिसुन आले नाही.

नाट्यकलावंतांसाठी व्यासपीठ असलेल्या बालगंधर्वांचा स्मृतीदिन उपेक्षित रहावा, त्यांना आदरांजलीही वाहु नये याबाबत आश्चर्यच व्यक्त केले जात आहे.

जळगावात वास्तव्य राहीलेल्या बालगंधर्वांची अशीही उपेक्षा होणे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही यानिमीत्ताने उपस्थित होत आहे.

भावी नाट्यकलावंत काय आदर्श घेणार
नाट्यक्षेत्रातील थोर बालगंधर्वांना अशा पध्दतीने विसरल्यास भावी नाट्यकलावंतासमोर कुठला आदर्श ठेवला जाईल याचा विचारच न झालेला बरा.

 

 

LEAVE A REPLY

*